Sun, Aug 25, 2019 00:07होमपेज › Ahamadnagar › भावाच्या अपघाताची खोटी माहिती देऊन चोरट्यांनी बहिणीला लुटले

भावाच्या अपघाताची खोटी माहिती देऊन चोरट्यांनी बहिणीला लुटले

Published On: Aug 26 2018 1:06PM | Last Updated: Aug 26 2018 1:06PMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

रक्षाबंधनसाठी माहेरी आलेल्या बहिणीला पोलिस खात्यात असलेल्या भावाचा अपघात झाल्याची माहिती देऊन अज्ञात चोरट्यांनी लूटले. ही घटना शनिवार (२५) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. दरम्यान दिवसाढवळया हा प्रकार घडल्याने श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा फसवणूक, जबरी चोरीचा गुन्हा श्रीगोंदा पोलिसात दाखल करण्यात आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सीमा अनिल बंडगर, बंडगरवाडी ( भिगवन ता. इंदापुर ) या रक्षाबंधन सणानिमित्त भिगवण येथून काष्टी येथे येत होत्या. बसने काल दुपारी त्या तीनच्या सुमारास काष्टीत उतरल्या. खरातवाडी येथे जाण्यासाठी अजनुज चौक येथे त्या थांबल्या होत्या. तेव्हा  एक अनोळखी व्यक्ती घाबरलेल्या अवस्थेत जवळ येवून त्यांना म्हणाला की, पोलिस खात्यात असणाऱ्या तुमच्या भावाचा अपघात झाला असून तुम्ही लगेच माझ्यासोबत चला. महिला सांगितलेल्या प्रकाराने गडबडून गेल्या. तसेच अज्ञाताने बंडगर यांना घाईने त्याच्या मोटारसायकलवर बसवून दौंडच्या दिशेने घेवून निघाला. त्यावेळी अचानक दुचाकीने रस्ता बदलल्याने त्या घाबरल्या मात्र काही समजण्यापुर्वीच त्या लुटारूने ढिगाऱ्याच्या आडोशाचा फायदा घेत फिर्यादी सीमा बंडगर यांना लाकडाने मारहाण करत अंगावरील व बॅगेतील एक लाख दहा हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने लुटले.

याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निलेश कांबळे हे करत आहेत.