Sat, Sep 22, 2018 02:54होमपेज › Ahamadnagar › उत्‍तर न आल्‍याने शिक्षकाकडून विद्यार्थिनींना मारहाण 

उत्‍तर न आल्‍याने शिक्षकाकडून विद्यार्थिनींना मारहाण 

Published On: Feb 08 2018 8:57PM | Last Updated: Feb 08 2018 8:57PMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील  खामकर वस्ती येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थिनींना शिक्षकाने अमानुष मारहाण केल्याची घटना आज(८) दुपारी चारच्या सुमारास घडली. मारहाणीत जखमी झालेल्या मुलींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, टाकळी कडेवळीत खामकर वस्ती येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या दिव्या खामकर व वैष्णवी कापरे या दोन विद्यार्थींनीना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने शिक्षकाने या दोन्ही विद्यार्थींना अमानुष मारहाण  केली. या दोन्ही विद्यार्थींनीना खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, शिक्षकाकडून अशा पद्धतीने मारहाण झाल्याने पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.