Thu, Feb 21, 2019 17:12होमपेज › Ahamadnagar › आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोची लागण?

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोची लागण?

Published On: Jul 31 2018 3:01PM | Last Updated: Jul 31 2018 3:01PMसंगमनेर : प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील आदिवाशी आश्रमशाळा व रामकृष्णहरी वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना सोमवारी दुपारनंतर गॅस्ट्रो सदृश्य आजाराची लागण झाली. जवळपास ५५ विद्यार्थ्यांना याची लक्षणे दिसत आहे.

या सर्वांना प्राथमिक उपचारासाठी तातडीने घारगाव (ता. संगमनेर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यातील अत्यव्यस्त असणाऱ्या ९ मुलांना पुढील उपचारासाठी लोणी प्रवरा येथे रात्रीच्या सुमारास हलविण्यात आले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.