Fri, Jun 05, 2020 22:18होमपेज › Ahamadnagar › ‘झेलम’वर दगडफेक, लुटालूट

‘झेलम’वर दगडफेक, लुटालूट

Published On: Dec 06 2017 1:46AM | Last Updated: Dec 06 2017 12:48AM

बुकमार्क करा

श्रीगोंदा : प्रतिनिधी 

क्रॉसिंगसाठी थांबलेल्या जम्मू-तावी झेलम एक्सप्रेस रेल्वेवर दगडफेक करत,  खिडकीतून हात घालून चोरट्यांनी महिलांचे दागिने, मोबाईल घड्याळ लांबविण्याचा प्रकार घडला. श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ते लिंपणगाव दरम्यान ही घटना घडली. रेल्वेतील प्रवाशांना याठिकाणी लुटण्याचा महिनाभरातील हा दुसरा प्रकार घडला आहे. सोमवारी सायंकाळी पुण्याहून सुटलेली पुणे जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस सातच्या दरम्यान दौंड स्थानकामध्ये आली.

ही गाडी रात्री साडेसातच्या सुमारास दौंडमधून निघाली. स्टेशन सोडल्यानंतर 15 मिनिटांच्या अंतरावर समोरून क्रॉसिंग आल्यामुळे ही रेल्वेगाडी उभी राहिली.  यावेळी अंधारात लपून बसलेल्या दरोडेखोरांनी  गाडीच्या बोगीवर  दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.  त्यानंतर खिडकीतून हात घालून महिलांचे दागिने, दोन मोबाईल संच तसेच घड्याळ असा एकूण 95 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. ही रेल्वे नगर रेल्वे स्थानकात  पोहोचल्यानंतर आर. बी दास, वैष्णवी हेमराज हेगडे, राणी खान यांनी फिर्याद दिली. त्यानुसार नगर रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास स. पो. नि. एस. डी. दिवटे हे करत आहेत.