Wed, Jan 23, 2019 23:57होमपेज › Ahamadnagar › सिन्नर-शिर्डी महामार्गावर अपघात: दुचाकीस्वार ठार

सिन्नर-शिर्डी महामार्गावर अपघात: दुचाकीस्वार ठार

Published On: Dec 12 2017 11:11PM | Last Updated: Dec 12 2017 11:11PM

बुकमार्क करा

सिन्नर : प्रतिनिधी

सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पांगरी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि.१२) रात्री साडे आठ वाजता घडली. रवींद्र रंगनाथ सांगळे (३२, रा. खंबाळे, ता.सिन्नर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सांगळे आपल्या दुचाकीने (एमएच १५, बीटी २७०५) वावीहून सिन्नरच्या दिशेने जात होते. त्याचसुमारास पांगरी शिवारातील शिंदे वस्तीजवळ समोरून येणार्‍या अज्ञात वाहनाने सांगळे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सांगळे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर शिर्डीला साईबाबाच्या दर्शनासाठी पायी जाणारा एक साईभक्त या अपघातात जखमी झाला.

जखमीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. याप्रकरणी वावी पोलिस स्टेशनमध्ये गुन्‍हा नोंद करण्यात आला आहे.