Wed, Feb 20, 2019 12:59होमपेज › Ahamadnagar › सबजेलमध्ये छिंदमला मारहाण झाल्याची अफवा

सबजेलमध्ये छिंदमला मारहाण झाल्याची अफवा

Published On: Feb 17 2018 2:27PM | Last Updated: Feb 17 2018 2:27PMअहमदनगर : प्रतिनिधी

शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या श्रीपाद छिंदम याला सबजेलमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी त्याला मारहाण होऊन त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली अशी माहिती पसरली होती.

तुरुंगाधिकारी नागनाथ सावंत यांनी माध्यमांबरोबर बोलताना सांगितले की, अशा प्रकारे मारहाण झाली नसल्याचे सांगितले. यानंतर छिंदम यांच्या सुरक्षेतेच्या कारणावरून त्यांना येरवडा किंवा नाशिक रोड येथे हालविण्याच्या हालचाली तुरुंग प्रशासनाच्या चालू होत्या. यामुळे सध्या सबजेलबाहेर मोठा पोलिस बंदोबस्‍त ठेवण्यात आला आहे.