Thu, Apr 18, 2019 16:06होमपेज › Ahamadnagar › नगर : छिंदमची खुर्ची मनपातून बाहेर फेकली

नगर : छिंदमची खुर्ची मनपातून बाहेर फेकली

Published On: Mar 08 2018 5:17PM | Last Updated: Mar 08 2018 5:37PM
नगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याला अहमदनगर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यावेळी नवीन उपमहापौर अनिल बोरूडे यांनी पदभार स्‍विकारल्यानंतर छिंदमची खुर्ची मनापातून बाहेर फेकण्यात आली. या वेळी युवासेनेचे विक्रम राठोड व महिला आघाडीच्या सदस्यांनी खुर्चीला लाथा मारून निषेध व्यक्त केला. यावेळी उपस्‍थित नागरिकांनी छिंदमच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

श्रीपाद छिंदमला शिवरायांबद्दल अपशब्द काढल्‍याप्रकरणी अटक झाल्यानंतर त्‍याला मारहाण करण्याचाही प्रयत्‍न करण्यात आला होता. याप्रकरणी राज्यातील विविध भागात छिंदम याच्याविरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आले आहेत. त्‍याला अटक झाल्यानंतर नाशिकच्या सबजेलमध्ये त्‍याला मारहाण झाल्याचीही अफवा पसरली होती. यानंतर त्याला येरवडा कारागृहात ठेवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला होता. 

संबंधित बातम्या

अखेर श्रीपाद छिंदमांचा राजीनामा महापौरांनी स्वीकारला

श्रीपाद छिंदमच्या सुनावणीकडे लक्ष

श्रीपाद छिंदमचा राजीनामा मंजूर