Tue, Jul 16, 2019 09:45होमपेज › Ahamadnagar › नगर : छिंदमला दोन्ही गुन्ह्यात जामीन मंजूर

नगर : छिंदमला दोन्ही गुन्ह्यात जामीन मंजूर

Published On: Mar 09 2018 1:54PM | Last Updated: Mar 09 2018 5:57PMनगर : प्रतिनिधी

शिवजयंती बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी श्रीपाद छिंदम याला आता दुसऱ्या गुन्ह्यातही जामीन मिळाला आहे. त्यामुळे छिंदम याची आता केव्हाही सुटका होण्याची शक्‍यता आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी छिंदम याने राजकीय द्वेषातून गुन्ह्यात गोवल्याचा दावा न्यायालयात केला आहे. या प्रकरणात त्याचे कोणीही वकीलपत्र घेतलेले नव्हते. त्यामुळे न्यायालयात त्याने दोन्ही गुन्ह्यात स्वतःच जामिनासाठी अर्ज केला होता.

शिवजयंती बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी श्रीपाद छिंदमला एका गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यात आला आहे. दुसऱ्या गुन्ह्याच्या जामिनासाठी छिंदमने अर्ज केला आहे. सरकारी पक्षाने केलेली पोलिस कोठडीची मागणी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळून लावली आहे.

श्रीपाद छिंदमला शिवरायांबद्दल अपशब्द काढल्‍याप्रकरणी अटक झाल्यानंतर त्‍याला मारहाण करण्याचाही प्रयत्‍न करण्यात आला होता. याप्रकरणी राज्यातील विविध भागात छिंदम याच्याविरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आले आहेत. त्‍याला अटक झाल्यानंतर नाशिकच्या सबजेलमध्ये त्‍याला मारहाण झाल्याचीही अफवा पसरली होती. 
 

वाचा संबंधित बातमी 

नगर : छिंदमची खुर्ची मनपातून बाहेर फेकली