Sun, Mar 24, 2019 10:58होमपेज › Ahamadnagar › बेकायदा मुरूम उत्खनन, ठेकेदाराला नोटीस 

बेकायदा मुरूम उत्खनन, ठेकेदाराला नोटीस 

Published On: Feb 18 2018 7:58PM | Last Updated: Feb 18 2018 7:58PMश्रीगोंदा- प्रतिनिधी 

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत चालू असलेल्या ३३  कोटीच्या रस्त्यासाठी ए.जी वाबळे या  ठेकेदाराने अवैधरित्या मुरुम उपसा केल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडने  केली होती. त्यावर तहसीलदार महेंद्र माळी यांनी ठेकेदाराला नोटीस बजावली असून, त्याबाबत आठ दिवसात खुलासा मागितला आहे. 

संभाजी ब्रिगेड ने  २६ डिसेंबर २०१७  रोजी तहसील कार्यालय व उपवंनसरक्षक श्रीगोंदा यांच्याकड़े बेकायदा मुरुम उत्खननाबाबत तक्रार केली होती. उत्खनन केलेला गट नं १८७२ या उताऱ्यावर फॉरेस्ट ची नोंद आहे. त्यावर संभाजी ब्रिगेडने प्रशासनाशी सात्यताने पाठपुरावा केला होता. अखेर तहसील प्रशासनाने दखल घेत व ठेकेदारास नोटीस काढली.

 तहसीलदार माळी यानी काढलेल्या नोटीसीत असे नमूद करण्यात आले आहे की, गट न.१८७२ मध्ये ३० ते ३५ हजार ब्रास मुरूमाचे बेकायदा उत्खनन झाल्याचे आढळून येते. या उत्खननाबाबत आपण रॉयल्टी भरली का? उपशाबाबत परवानगी घेतली का याबाबत  बोध होत नसल्याने हा मुरुम उपसा बेकायदा असल्याचे दिसुन येते. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील ४८ (७) नुसार दंडात्मक रक्कम वसूल का करण्यात येऊ नये. याबाबत  आठ दिवसात लेखी खुलासा सादर करण्याचा आदेश दिला आहे.

शहरात सुरु असलेले रस्ते हे पहिल्या पासुनच वादग्रस्त ठरले असून,  शहर परीसरात कोठे कोठे  मुरूमाचे उत्खनन झाले आहे. यामध्येही अनियमिता असण्याची शक्यता आहे.३३ कोटींचे रस्ते शहराच्या विकासासाठी आहेत की ठेकेदाराच्या व पदाधिकाऱ्यांच्या ? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. संभाजी ब्रिगेड रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला राहावा यासाठी प्रयत्नशील राहील . निकृष्ट कामे करणाऱ्यांची  गय केली जाणार नाही, असे अरविंद कापसे ,टिळक भोस,सतीश बोरुडे यानी सांगितले