Wed, Nov 21, 2018 05:08होमपेज › Ahamadnagar › अहमदनगर: भाजप आमदार कर्डिले यांना अटक, तपासासाठी 'एसआयटी'ची स्‍थापना

अहमदनगर: भाजप आमदार कर्डिलेंना अटक, तपासासाठी 'एसआयटी'ची स्‍थापना

Published On: Apr 09 2018 10:13AM | Last Updated: Apr 09 2018 12:10PMनगर- केडगाव येथील खून प्रकरण व पोलिस अधीक्षक कार्यालयातील तोडफोडप्रकरणी आरोपी असलेले भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले आज सकाळी पोलिसांना शरण आले. कँप पोलिस ठाण्यात त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे.

केडगाव परिसरात दोन शिवसैनिकांची हत्या प्रकरणात भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना आरोपी केलेले आहे. तसेच शनिवारी रात्री राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोड प्रकरणात त्यांचे सासरे आमदार कर्डिले यांनाही आरोपी केलेले आहे. दोन गुन्ह्यात आरोपी झाल्यानंतर आमदार कर्डिले हे सोमवारी सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांना शरण आले. त्यानंतर कर्डिले यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात कँप पोलिसांनी अटक केली आहे.

या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी आज सकाळी याबाबतचा आदेश काढला आहे. पथकाचे प्रमुख म्हणून अपर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार तपासी अधिकारी म्हणून काम पाहतील. या पथकात सहाय्यक पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील पवार, तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 