Mon, Nov 19, 2018 10:31होमपेज › Ahamadnagar › पोलिसांवर दगडफेक प्रकरणी १५ शिवसैनिक पोलिसांत हजर

पोलिसांवर दगडफेक प्रकरणी १५ शिवसैनिक पोलिसांत हजर

Published On: May 18 2018 12:53PM | Last Updated: May 18 2018 12:52PMनगर: प्रतिनिधी

केडगाव येथील शिवसैनिकांच्या हत्येनंतर पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यातील आरोपी असलेले  पंधरा शिवसैनिक आज सकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू असून, या शिवसैनिकांना दुपारी  न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

शरण आलेल्या शिवसैनिकांमध्ये  शहरप्रमुख नगरसेवक दिलीप सातपुते, विक्रम राठोड, दीपक खैरे, हर्षवर्धन कोतकर, रमेश परतनी, सुनील सातपुते, देविदास मोढवे, मुकेश जोशी, विजय पठारे, संतोष फसले, चेमन शर्मा, विशाल गायकवाड, शुभम बेंद्रे, अनिल लालबोंद्रे, लंकेश हरबा यांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी संबंधितांच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण केली.