Thu, Apr 25, 2019 16:13होमपेज › Ahamadnagar › साईभक्तांचे अडीच लाख रुपये लांबविले 

साईभक्तांचे अडीच लाख रुपये लांबविले 

Published On: Dec 30 2017 12:33AM | Last Updated: Dec 29 2017 10:49PM

बुकमार्क करा
शिर्डी : प्रतिनिधी 

शिर्डीत साई दर्शनासाठी आलेल्या तीन कुटुंबाचे एकाच हॉटेलमधून एकाच रात्री, एकाच वेळी 2 लाख 56 हजारांची चोरी झाली असून साईभक्तांच्या तक्रारीवरून शिर्डी पोलिस ठाण्यात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शिर्डीतील एका हॉटेलमध्ये दि. 27 रात्री 11 वा. ते दि. 28 पहाटेच्या दरम्यान एकाच इमारतीतील तिसरा  व चौथ्या मजल्यातील तीन खोल्यांमधून साईभक्तांचा मुद्देमाल लंपास केला आहे. चोरट्याने या खोल्यांच्या खिडक्यांमधून प्रवेश करत ही चोरी केली आहे.

 याबाबतची तक्रार वरूण अनिलकुमार वर्मा (रा. पंजाब) यांनी दिली आहे. दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या खोलीमधून 50 हजार रूपयांची रोकड, 1 लाख 29 हजार रूपयांचे दोन आयफोन, तर डॉ. अनुराग पुरवार (रा. पंजाब) यांच्या खोली क्र. 203 मधून 70 हजार रुपयांची रोकड, तर अमृतसर येथिल कमलजीत सिंह यांची 5 हजाराची रोकड अशी एकूण 2 लाख 56 हजारांची चोरी झाली आहे. तसेच हॉटेलने कोणतेही सहकार्य केलेल नाही. या प्रकरणाचा तपास पोनि. प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.