Wed, Sep 19, 2018 10:30होमपेज › Ahamadnagar › साईंना २१ किलो चांदीचे सिंहासन

साईंना २१ किलो चांदीचे सिंहासन

Published On: Sep 03 2018 1:38AM | Last Updated: Sep 03 2018 12:51AMशिर्डी : प्रतिनिधी

साईबाबांची वाढती ख्याती व साईबाबांच्या महिमा दिवसेंदिवस वाढत असताना नोएडा येथील एका साईभक्ताने तब्बल 21 कि. 502 ग्रॅम वजनाचे चांदीचे सिंहासन व साई प्रतिमेची चांदीची फ्रेम साई चरणी अर्पण करण्यात आली आहे. 

नोयडा येथील देणगीदार साईभक्‍त प्रशांत श्रीवास्तव यांनी 7 लाख 74 हजार 72 रुपये किंमतीच्या 21 किलो 502 ग्रॅम वजनाच्या चांदीचे सिंहासन, फोटो फ्रेम व पाट संस्थानला देणगी दिली. ते शिर्डीत रविवारी सकाळच्या सुमारास साई दर्शनासाठी आले होते. या प्रसंगी वरील दान दिले. या वस्तूंची संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी विधीवत पूजा केली. यातील सिंहासन व फोटो फ्रेमचा वापर समाधी मंदिरातील श्रींच्या फोटोकरीता करण्यात येणार असून पाटाचा वापर मंदिरातून दर गुरुवारी निघणार्‍या पालखीतील पादुका व सटका ठेवण्यासाठी करण्यात येणार आहे.

साईभक्तांना बाबांच्या अनुभूतीचे नेहमीच अनुभव येत असतात. ‘जैसा जैसा भजे, तैसा तैसा पावे’ या उक्तीच्या असे चमत्कार भाविक दानाच्या माध्यमातून दाखवत असतात. असाच हा चमत्कार असल्याचं भाविक मानतात. म्हणून साईंच्या दानांत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या दानाचा वापर विकासकामांसाठी करण्याची मागणी आहे.