Tue, Jul 23, 2019 17:34होमपेज › Ahamadnagar › गोळीबारामागील बोलविते धनी कोण?

गोळीबारामागील बोलविते धनी कोण?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

शेवगाव : प्रतिनिधी 

शेतकर्‍यांवर गोळीबार प्रकरणी प्रशासनाकडे बोट दाखविण्यापेक्षा त्यांचा बोलविता धनी कोण, याचा शोध घेण्याची गरजआहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी केले.

शेवगाव तालुक्यातील घोटण येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात खा. शेट्टी बोलत होते. या वेळी संघटनेचे पश्‍चिम विभागीय अध्यक्ष प्रकाश बालवडकर, युवक संघटनेचे अध्यक्ष अमरसिंह कदम, मराठवाडा विभागीय अध्यक्ष माणिकराव कदम, बापूसाहेब कारंडे, अमोल हुप्परगे, जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे, तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, शहराध्यक्ष दत्तात्रय फुंदे , बाळासाहेब फटांगडे, अमोल घोलप, दादा पाचरणे, राम गोरे, भगवान घुगे,सुनील लोंढे, आनंदा जाधव, मयूर गोरडे, संजय शिंदे, महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा  स्नेहल फुंदे, शर्मिला येवले, चंद्रकांत झारगड, दशरथ सावंत, घोटणचे सरपंच अरुण घाडगे, युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश देठे, मच्छिंद्र आर्ले आदी उपस्थित होते.

आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ला व गोळीबाराच्या घटनेसंदर्भात बोलताना खा. शेट्टी म्हणाले, या घटनेबाबत प्रशासनाकडे बोट दाखविण्यापेक्षा त्यांचा बोलविता धनी कोण, याचा शोध घेण्याची गरजआहे. शेतकरी व प्रशासन यांच्यात भांडणे लावून नामानिराळे राहण्याची राज्यकर्त्यांची खेळी आहे. यापासून शेतकर्‍यांनी सावध राहण्याची गरज आहे. कापसाला भाव मिळावा, यासाठी अमरावती येथे कापूस उत्पादकांच्या आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. साखर कारखान्यात  तयार झालेली साखर, त्याची विक्री याचा हिशेब शेतकर्‍यांना मिळाला पाहिजे. दर जाहीर होत नाही, तो ऊस देऊ नका, असेही ते म्हणाले.