Wed, Jul 08, 2020 03:35होमपेज › Ahamadnagar › पोलिस निरीक्षक सक्तीच्या रजेवर

पोलिस निरीक्षक सक्तीच्या रजेवर

Published On: Dec 19 2017 1:55AM | Last Updated: Dec 18 2017 11:27PM

बुकमार्क करा

शेवगाव : प्रतिनिधी 

येथील नगरसेवक तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक आहुजा यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षकांवर गुन्हा दाखल करुन त्यांना तात्काळ निलंबीत करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सर्वपक्षीय रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. संबंधित अधिकार्‍यावर सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई केल्यानंतर व वस्तुदर्शी अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविण्याचे आश्‍वासन उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत शिवथरे यांनी दिल्यानंतर हे अंदोलन स्थगित करण्यात आले.

दि. 16 रोजी सांयकाळी नगरसेवक तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक आहुजा हे रात्रीची गस्त घालणार्‍या कार्यकर्त्याची यादी देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता तेथे दोन व्यक्तीचा वाद चालु होता ते हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत होते याचा राग येऊण पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी आहुजा यांची गंचडी धरूण अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. या प्रकारा बाबत भाजपा कार्यकत्यांनी संबधीत पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करुण त्यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, पालकमंत्री, प्रदेशाध्यक्ष, खासदार, आमदार, जिल्हा पोलिस प्रमुख यांना देऊन सोमवारी शहर बंदची हाक दिली होती. खा. दिलीप गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी दुरध्वनीद्वारे संपर्क करुन संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करण्याची मागणी केली. मुख्यमत्र्यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. दि. 18 रोजी पोलिस निरीक्षक यांना निलंबीत करण्याच्या मागणीसाठी सकाळपासून शहरात सर्वपक्षीय कडकडीत बंद पाळण्यात आला. भाजपाचे ज्येष्ठनेते बापुसाहेब भोसले, तालुकाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर, नगरसेवक अशोक आहुजा, कमलेश गांधी, कैलास तिजोरे, शब्बीर शेख, विकास फलके, दिगंबर काथवटे, साईनाथ आधाट, रविंद्र सुरवसे, शिवसेना तालुकाध्यक्ष भारत लोहकरे, दिनेश लव्हाट, भिमराज सागडे, उमेश भालसिंग, दत्तात्रय फुंदे, सतिष लांडे, अजिंक्य लांडे, अ‍ॅड. अविनाश मगरे, राजु लड्डा सुनिल रासणे. बाळू कोळगे, नंदु मुंढे आदींसह शैकडो कार्यकर्त्यानी निषेध सभा घेऊन कारवाईची मागणी केली. या सभेत शहरातील राधा गुंजाळ या महिलेने आपले तीन तोळे सोने चोरीला गेले याची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात चकरा मारल्या परंतु कारवाई झाली नाही, परंतु उलट मलाच संबंधित अधिकार्‍याने हमरीतुमरी केल्याचे सांगितले.

सभेदरम्यान दोषी अधिकार्‍यावर कोणतीच कारवाई होत नसल्याचे पाहुन संतप्त नागरीकांनी रस्तारोको अंदोलन सुरु केले. आंदोलक कारवाईवर ठाम होते. कारवाई होईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा त्यांचा निर्धार होता. एकंदरित परिस्थिती पाहता एक तासानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत शिवथरे यांनी पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असून घटनेचा वास्तवदर्शी अहवाल दोन दिवसात वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. यावेळी आंदोलकांनी निलंबनाच्या कारवाईसाठी दोन दिवसांचा कालावधी दिला. अन्यथा तालुकाभर रस्तारोको अंदोलनाचा इशारा देऊन हे अंदोलन स्थगित केले.