Thu, Nov 15, 2018 18:03होमपेज › Ahamadnagar › नगर : बंदोबस्‍त करून परतणार्‍या पोलीस व्‍हॅनला अपघात

नगर : बंदोबस्‍त करून परतणार्‍या पोलीस व्‍हॅनला अपघात

Published On: Apr 10 2018 11:49AM | Last Updated: Apr 10 2018 12:10PMनगर: प्रतिनिधी

नगर-औरंगाबाद रस्त्यावरील माळीचिंचोरा (ता. नेवासा) शिवारात कंटेनर व पोलिस वाहनाची धडक होऊन पोलिसांना दुखापत झाली आहे. या अपघातातील एका कर्मचार्‍याचा हात तुटला आहे, तर इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे. या व्हॅनमध्ये २५ पोलीस कर्मचारी होते.

केडगाव उपनगरातील दुहेरी हत्याकांड व पोलीस अधीक्षक कार्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांचा बंदोबस्त नगरला ठेवण्यात आला होता. २५ पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन पोलीस वाहन जळगावकडे परत जात असताना सकाळी पावणेआठ वाजता नगरच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरने पोलीस व्हॅनला जोराची धडक दिली. यात पोलिस जखमी झाले. जखमींवर नेवासा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.