Fri, Mar 22, 2019 07:44होमपेज › Ahamadnagar › नगरः सातपुतेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

नगरः सातपुतेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Published On: Mar 20 2018 4:59PM | Last Updated: Mar 20 2018 5:02PMनगरः प्रतिनिधी

मनपा पथदिवे घोटाळ्यातील प्रमुख आरोपी रोहिदास गजानन सातपुते याचा अटकपूर्व जामीन अर्ज आज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावला. न्या. एस. एस. पाटील यांच्यासमोर ही सुनावणी झाली.

अटकपूर्व जामीन अर्जावर सुमारे अडीच तास सुनावणी झाली. आरोपीचे वकील सपकाळ यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, सातपुते याच्याकडे महापालिकेतील विद्युत विभागासह इतर विभागांचीही अतिरिक्त जबाबदारी होती. त्याचा या गुन्ह्यात सहभाग नसल्याने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा. त्यावर सरकारी वकील रश्मी गौर यांनी आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद फेटाळून लावला. महापालिकेतील 34 लाख रुपयांच्या पथदिवे घोटाळ्यात आरोपी सातपुते याचा महत्त्वाचा सहभाग आहे. गायब असलेल्या कामांच्या मूळ फायली त्याच्या ताब्यात असल्याचा जबाब ठेकेदार लोटके याने दिलेला आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याला अटक करणे आवश्यक आहे. 

यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने आरोपी सातपुते याचा अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. गुन्ह्याचे तपासी अधिकारी सुरेश सपकाळे हेही न्यायालयात उपस्थित होते.

Tags : satputhe, anticipatory bail, rejected, aurangabad, high court bench