होमपेज › Ahamadnagar › राजीनाम्यासाठी सरपंचावर खुनी हल्ला

राजीनाम्यासाठी सरपंचावर खुनी हल्ला

Published On: Mar 04 2018 1:46AM | Last Updated: Mar 04 2018 1:07AMजामखेड : प्रतिनिधी

सरपंचपदाचा राजीनामा देत नसल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील मोहरी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. त्यामध्ये सरपंचासह सातजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी 20 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

मोहरी शिवारात गुरुवारी  सरपंचपदाचा राजीनामा देत नसल्याच्या कारणावरून दोन गटात लोखंडी टॉमी, दगड व काठ्यांनी तुंबळ हाणामारी झाली. त्यामध्ये सरपंच युवराज बाबासाहेब हाळनोर हे गंभीर जखमी झाले. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहेे की, त्रिंबक नंदू गोपाळघरे, नंदू दादाराव गोपाळघरे, नवनाथ दादाराव गोपाळघरे, नाना बळीराम गोपाळघरे, गोकुळ गोपाळघरे, रामदास शिवदास गोपाळघरे, शिवदास एकनाथ गोपाळघरे, रोहित नवनाथ गोपाळघरे, गोरख विश्‍वनाथ गोपाळघरे, भास्कर विश्‍वनाथ गोपाळघरे, राहुल गोरख गोपाळघरे, पप्पू गोरख गोपाळघरे, बाळू भीमा ठोंबरे, बंडू भीमा ठोंबरे, भीमा ठोंबरे, गुड्डू भास्कर गोपाळघरे (सर्व रा. मोहरी. ता. जामखेड), भाऊसाहेब नारायण जायभाय, संभाजी जायभाय, कांतीलाल जायभाय यांचा मुलगा व पंडित जायभाय हे चारजण (सर्व रा. जायभायवाडी, ता. जामखेड) अशा एकूण वीसजणांनी लोखंडी टॉमी, दगड व काठीने आपल्यासह इतर लोकांना मारहाण केली; तसेच सरपंचपदाचा राजीनामा देण्यासाठी धमकी देखील दिली आहे. 

मारहाणीत बाबासाहेब काशिनाथ हाळनोर, संजय सुखदेव हाळनोर, पार्वती सुखदेव हाळनोर, राधा युवराज हाळणोर, राजेंद्र अभिमान गलांडे, बंडू श्रीपती बाबर (सर्व रा. मोहरी) हे गंभीर जखमी झाले. हाळनोर यांच्या फिर्यादीवरून वीसजणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नामदेव सहारे करीत आहेत.