Sun, Nov 18, 2018 05:56होमपेज › Ahamadnagar › सहाशे किलो गोमांस पकडले

सहाशे किलो गोमांस पकडले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

संगमनेर : प्रतिनिधी 

संगमनेरातील भारतनगर परिसरात पोलिसांच्या गस्ती पथकाने छापा टाकून 60 हजार रुपये किंमतीचे 600 किलो गोमांसासह एक टेम्पोही जप्त केला. मात्र, वाहनचालक वसीम कुरेशी पसार झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार आरोपीचा शोध घेतला जात आहे.

 सोमवारी (दि.27) सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास जमजम कॉलनी परिसरात गोवंशाची कत्तल करून त्यांचे मांस वाहनातून नेले जात असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार शहर पोलिस ठाण्यातील दोघा बीट मार्शलनी या परिसरात वाहनांची तपासणी केली असता, एका टेम्पोवर (क्रमांक एम.एच 04/जेसी 4846) त्यांचा संशय बळावला. त्याला थांबण्याचा इशारा केला असता, वाहनचालक टेम्पो रस्त्यातच सोडून पळून गेला. 

पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता, त्यात सहाशे किलो वजनाचे आणि 60 हजार रुपये किंमतीचे गोमांस आढळले.याप्रकरणी आरोपी वसीम अब्दुल करीम कुरेशी (रा.जमजम कॉलनी) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.संगमनेरमध्ये गोमांस विक्री करणार्‍यांवर अनेकवेळा कारवाई केली जाते. मात्र, पुन्हा त्याचठिकाणी हा व्यवसाय सुरू होत असल्याने या व्यवसायाला आळा घालायचा कसा ? असा प्रश्‍न संगमनेर पोलिसांसमोर उभा ठाकला आहे.