Wed, Jul 24, 2019 12:07होमपेज › Ahamadnagar › अन बस चालकाचा ताबा सुटला

अन बस चालकाचा ताबा सुटला

Published On: Dec 31 2017 1:30AM | Last Updated: Dec 30 2017 11:49PM

बुकमार्क करा
संगमनेर : प्रतिनिधी 

अकोलेहून संगमनेरकडे निघालेली बस संगमनेर बसस्थानकाजवळ येताच चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने दुभाजकावर जाऊन आदळली. सुदैवाने बसचे मागील चाक रस्ता दुभाजकात अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. काल सकाळी 11 वाजता अकोलेहून गणोरेमार्गे संगमनेरला पोहोचलेली बस (क्रमांक एम.एच.20/डी.7905) बसस्थानकाकडे जात असताना या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. काही समजण्याच्या आतच सदरची बस रस्ता दुभाजकावर चढून विरुद्ध बाजूला असलेल्या फळ विक्रेत्यांच्या दुकानात घुसली. 

या घटनेनंतर बसचालक वाहन सोडून बसस्थानकात पळून गेल्याने सुमारे तासभर पुणे-नाशिक महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी काही नागरीकांच्या मदतीने वाहतूक वळवून कोंडी फोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. घटनेची माहिती मिळताच संगमनेर आगारातील तांत्रिक विभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत सदरची बसस्थानकात नेली आणि या महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.