Fri, Sep 20, 2019 04:46होमपेज › Ahamadnagar › संगमनेर : मतीमंद मुलीवर अत्‍याचार 

संगमनेर : मतीमंद मुलीवर अत्‍याचार 

Published On: Dec 03 2017 7:24PM | Last Updated: Dec 03 2017 7:23PM

बुकमार्क करा

संगमनेर / प्रतिनिधी

तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील एका मतीमंद मुलीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना दोन दिवसांपुर्वी घडली होती. परंतु ती आज रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी नराधमावर घारगाव पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे राहत असलेली मतीमंद मुलगी एकटीच घरी होती. त्यावेळी गिताराम भिल्ल हा तिच्या घरी आला. त्याने घरी कोणी नसल्याचा व तिच्या मतीमंदपणाचा फायदा घेत त्याने दि.३० नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुलीवर अत्याचार करुन फरार झाला. ही बाब त्याच दिवशी अत्याचारीत मुलीने तिच्या आईला इशाराद्वारे सांगितली. त्यानंतर तिच्या आईने आज रविवारी घारगाव पोलिस ठाण्यात गिताराम भिल्ल याच्या विरोधात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गिताराम भिल्लच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपअधिक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex