Tue, Nov 20, 2018 01:38होमपेज › Ahamadnagar › कुख्यात वाळूतस्कर माळी बंधूंची टोळी तडीपार

कुख्यात वाळूतस्कर माळी बंधूंची टोळी तडीपार

Published On: May 01 2018 2:18PM | Last Updated: May 01 2018 2:18PMअहमदनगर : प्रतिनिधी

राहुरी तालुक्यातील कुख्यात वाळूतस्कर सुभाष माळी व त्याचे दोन बंधू अशी तिघांची टोळी 2 वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी आज ही कारवाई केली. 

तडीपार झालेल्यांमध्ये टोळी प्रमुख सुभाष साहेबराव माळी (वय- ३२), गौतम साहेबराव माळी (वय- ३०), किशोर साहेबरा माळी (वय- २७, तिघे रा. आतारमळा, बारागाव नांदूर, ता. राहुरी) यांचा समावेश आहे.  या टोळीविरुद्ध वाळू तस्करी, अपहरण, घातक शस्त्रे बाळगणे, गावठी काट्यांचा वापर करून धमकावणे, जबरी चोरी, दरोडा, शासकीय सेवकास मारहाण इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. राहुरी पोलिस ठाण्याचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांसमोर सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर अंतिम सुनावणी घेऊन पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी आज माळी बंधूंची टोळी नगर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केली आहे.