Thu, Jun 20, 2019 00:30होमपेज › Ahamadnagar › अन्यथा जनतेवर अत्याचार झाले असते : संभाजी भिडे

अन्यथा जनतेवर अत्याचार झाले असते : संभाजी भिडे

Published On: Jun 11 2018 1:05AM | Last Updated: Jun 11 2018 1:05AMनगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्याने मुस्लिमांचा नंगानाच थांबला. अन्यथा  महाराष्ट्रातील जनतेवर अत्याचार झाले असते, असे वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी नगरमध्ये आयोजित सभेत केले. ‘संकल्प सुवर्ण सिंहासनाचा, जागर हिंदुत्वाचा’ या उपक्रमांतर्गत नगरमधील पटेल मंगल कार्यालयात सभेत ते बोलत होते. याच सभेत भिडेंनी नगरला ‘अंबिकानगर’ असेही संबोधले आहे. 

या कार्यक्रमास आरपीआय व इतर संघटनांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. आंबेडकरी संघटनांनी सभेच्या ठिकाणी मोर्चा काढला होता. त्यांनी भिडे गुरुजींविरोधात घोषणाबाजी केली. सभेत भिडे गुरुजी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करणार्‍या तीस ते चाळीस कार्यकत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

भिडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासाठी प्रत्येक तालुक्यात दोन हजार धारकरींनी निधी गोळा करायचा आहे. सरकारकडे यासाठी निधी मागणार नाही. सरकारने निधी दिला तरी आपण तो घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्याने मुस्लिमांचा नंगानाच थांबला, नाहीतर महाराष्ट्रातील जनतेवर अत्याचार झाले असते. मुस्लिमांनी देशातील सर्व मंदिरे उद्ध्वस्त 
केली. 

महाराष्ट्रातील मंदिरे वाचली, ती फक्त शिवाजी महाराजांमुळेच, हे आपण लक्षात ठेवायला हवे, असेही ते म्हणाले. रायगडावर खडा पहारा देण्यासाठी दररोज दोन हजार धारकरी रायगडावर जाण्यास तयार आहेत. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे 1 हजार 284 किलोचे सिंहासन उभारणार आहोत. येत्या सव्वा वर्षात सिंहासनाचे काम पूर्ण करणार असल्याचेही भिडे यांनी यावेळी सांगितले.