Fri, Apr 26, 2019 03:21होमपेज › Ahamadnagar › साईचरणी साडेचार कोटींचे दान

साईचरणी साडेचार कोटींचे दान

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

शिर्डी : प्रतिनिधी

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या रामनवमी उत्सव काळात साईभक्तांनी 4 कोटी 33 लाख रुपयांचे दान दिले असल्याची माहिती साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.

 शिर्डीत मंदिर परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत अग्रवाल बोलत होत्या. याप्रसंगी श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने 24 मार्च  ते 26 मार्च या कालावधीत आयोजित केलेल्या श्री रामनवमी उत्सवात 4 कोटी 33 लाख रुपये इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर व मुख्य लेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब घोरपडे आदी उपस्थित होते.
उत्सवानिमित्त शिर्डीत लाखो भाविकांनी हजेरी लावली. श्री रामनवमी उत्सवामध्ये रोख स्वरुपाते 3 कोटी 38 लाख रुपये, सोने-चांदी एकूण 88 लाख 72 हजार रुपये व परकीय चलन 6 लाख 30 हजार रुपये असे एकूण 4 कोटी 33 लाख रुपये वस्तू, रोख, डेबिट-क्रेडिट, ऑनलाईन, चेक-डी.डी., मनिऑर्डर व परकीय चलन स्वरुपात देणगीद्वारे प्राप्त झाले आहेत.
यामध्ये दक्षिणापेटी मोजणी 1 कोटी 98 लाख 96 हजार 297 रुपये, देणगी काऊंटर 71 लाख 64 हजार 292 रुपये, डेबिट क्रेडिट कार्ड 21 लाख 31 हजार 382 रुपये, ऑनलाईन देणगी 19 लाख 85 हजार 155 रुपये, डी. डी.देणगी 23 लाख 14 हजार 875 रुपये, मनी ऑर्डर देणगी 3 लाख 76 हजार 428 रुपये, सोने 577.800 ग्रॅम व चांदी 3059.000 ग्रॅम, 18 देशांचे परकीय चलन अंदाजे 6 लाख 30 हजार 746 रुपयांचा समावेश आहे. 

याव्यतिरिक्त मुंबई येथील साईभक्त जयंतीभाई यांनी 1351 ग्रॅम वजनाची  39 लाख रुपये किंमतीची सोन्याची पंचारती, तर नेल्लूर येथील साईभक्त चिराला चन्नारेड्डी यांनी 1133.500 ग्रॅम वजनाच्या 32 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या पादुका देणगी दिलेल्या आहेत.

श्री रामनवमी उत्सवाच्या कालावधीत 1 लाख 93 हजार 597 साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. यात टाइम बेस, पीआरओ व ऑनलाईन या सेवांचा समावेश आहे. या कालावधीमध्ये श्री साईप्रसादालयात 1 लाख 93 हजार 784 साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला, तर दर्शन रांगेत 2 लाख 21 हजार 600 साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे वाटप करण्यात आले. 

या कालावधीत 2 लाख 14 हजार 78 प्रसादरुपी लाडू पाकिटांची विक्री करण्यात आली. तसेच साईप्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्तनिवासस्थान, द्वारावती निवासस्थान, साईआश्रम भक्तनिवास येथे राहण्याची सोय होती.


  •