Fri, Apr 26, 2019 17:21होमपेज › Ahamadnagar › दरोडेखोरांची टोळी पकडली

दरोडेखोरांची टोळी पकडली

Published On: Jan 15 2018 1:40AM | Last Updated: Jan 14 2018 10:44PM

बुकमार्क करा
नेवासा : प्रतिनिधी

दरोडयाच्या तयारीत असलेल्या सहा जणांना टोळीला नेवासे पोलिसांनी रविवारी (दि.14) भेंडा ते वाकडी शिवारात पकडले. या टोळीकडून एक गावठी कट्ट्यासह तीन जीवंत काडतुसे, घरफोडीचे साहित्य आणि दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

संजय रावसाहेब चव्हाण(वय 30, रा रांजणी ता शेवगाव), अनिल शामराव बनसोडे (वय 25, रा. विहामांडवा, हल्ली जोगेश्वरी सोलापूर), गोपाळ दत्तू काळे (वय 19, रा. कुंभारी सोलापूर), शुभम अनिल काळे (वय 21, गणेशनगर राहाता), भारत तात्याजी काळे (वय 21,रा.गणेशनगर), राहुल दारासिंह आढागळे ( वय 19, सौंदाळे, ता. नेवासे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्वांवर नेवासा पोलिसांनी दरोडयाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला आहे.

काही तरुण दरोडा टाकण्यासाठी भेंडा परिसरात आले आहेत, अशी माहिती नेवासे पोलिसांना खबर्‍याकडून मिळाली. त्यानुसार पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, उपअधीक्षक अभिजित शिवथरे, नेवासा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे यांच्या नेतृत्वाखाली नेवासे पोलिस आणि कुकाणा चौकींच्या पोलिसांच्या पथकाने रविवारी (दि. 14) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भेंडा कारखान्याजवळील देवगाव-रांजणगांव चौफुल्यावर आरोपी गोपाळ, शुभम,भारत व राहुल या चौघांना तर रविवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास कुकाणा पोलिसांनी अनिल व संजय या आरोपींना पाठलाग करून पकडले. या टोळीकडून एका गावठी कटटयासह तीन काडतुसे, घरफोडीचे साहित्य, दोन पल्सर मोटारसायकली  हस्तगत केल्या आहेत. त्या दोन्ही ही एकाच क्रमांकाच्या आहेत.

नेवासा पोलिस ठाण्याचे निरीक्षक  यांच्या मार्गदर्शनाखाली कुकाणा पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे, हवालदार संतोष फलके, नितीन भताने, सोमनाथ कुंढारे, प्रवीण दहिणीवाळ, दिलीप कुहाडे यांच्या पथकाने ही कामगिरी  केली.