Wed, Jan 29, 2020 23:39होमपेज › Ahamadnagar › कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Published On: Dec 01 2017 8:31AM | Last Updated: Dec 01 2017 8:31AM

बुकमार्क करा

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील घटनेचा निकाल लागून काही तास झाले नाहीत, तोच तालुक्यातील इयत्ता 9 वी मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन दलित मुलीवर वारंवार अत्याचार करुन तिला गर्भवती केल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपीदेखील अल्पवयीन आहे. त्याच्याविरूध्द भादंवि कलम 376, 452, 506, व बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम 3,4 व अ. ज. ज. का.क 3 (1) आर एस , 3 (1) डब्ल्यू 2 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, मार्च 2016 मध्ये पिडीता ही एक दिवस त्यांच्या शेतातील चिंचेच्या झाडावर चढून खाण्यासाठी चिंचा काढत असताना तेथे आरोपी आला. त्याने तिच्या अंगाला हात लावला. यानंतर आठ दिवसांनी पीडिता शेतात काम करीत असताना आरोपीने तिला मक्याची कणसे देतो, असे सांगून बोलावून घेतले. 

तेव्हा तिच्यावर अत्याचार केला. कोणाला सांगू नको, असे धमकावले.भितीने तिने कोणाला काही सांगितले नाही. त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये दुपारच्या वेळी पीडिता घरामध्ये एकटी असताना आरोपी तेथे गेला. तेव्हा त्याने तिच्यावर बळजबरी केली. कोणाला सांगू नको, असे पुन्हा धमकावले. या घटनेनंतर पीडितेचे जेवण करण्याचे प्रमाण वाढले आणि पोटही वाढले असता आईने 27 नोव्हेंबर रोजी खाजगी रूग्णालयात नेऊन तपासणी केली. सोनोग्राफी केली असता डॉक्टरांनी पीडिता गरोदर असल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी पीडितेने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे करीत आहेत.

चाईल्ड लाईन संस्थेचा मदतीचा हात

सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत नगर येथे चाईल्ड लाईन या संस्थेशी संपर्क साधला. संस्थेचे स्वयंसेवक काल (दि. 30) दिवसभर रूईगव्हाण येथे उपस्थित होते. त्यांनी पीडितेस सर्वप्रकारची मदत करण्याची जबाबदारी घेतली आहे. कर्जत येथील महिला दक्षता समितीच्या मनिषा सोनमाळी यांनी सहकार्य केले.