Wed, May 22, 2019 22:26



होमपेज › Ahamadnagar › कोपरगावातील ४ कत्तलखान्यांवर छापा, एक कोटींचा मुद्देमाल जप्त 

कोपरगावातील ४ कत्तलखान्यांवर छापा, एक कोटींचा मुद्देमाल जप्त 

Published On: Feb 13 2018 11:26PM | Last Updated: Feb 13 2018 11:26PM



कोपरगाव : प्रतिनिधी

कोपरगाव शहरात मंगळवारी सायंकाळी सात वाजता  स्थानिक गुन्हे शाखेने चार कत्‍तलखान्यांवर छापे टाकले. बैल बाजार परिसरातील संजयनगर, आयशा कॉलनी येथे चार ठिकाणी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकले. या छाप्यात एक कोटी रूपयांची 337 जीवंत जनावरे, 65 जनावरे कत्तल केलेल्या अवस्थेततील 19500 किलो वजनाचे गोमांस, विविध हात्यारे आणि २० हजारची रोख रक्कम, पाच ते सात मोबाइल, दोन टेम्पोसह 11 जनांना ताब्यात घेण्यात आले आहे.  

वर्षानुवर्षे याच परिसरात राजरोसपणे कत्तलखाना सुरू असून, आजपर्यंत थातुर माथुर काररवाई वगळता इतकी मोठी कारवाई झालेली नव्हती.

बाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, संजयनगर भागात इतक्या मोठ्या प्रमाणात जनावरे येणार असल्याची गुप्तहेराकडून माहीती  स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर  नगर व कोपरगावच्या  खास पथकाने सापळा लावला. बैल बाजार परिसरात 337 जीवंत जनावरे, आयशा कॉलनी व गवारे नाईट स्कूल  जवळील कत्तलखान्यात कत्तल केलेले 65 जनावरांचे मांस. तसेच कत्तल करण्यासाठी लागणारे साहित्य, एक टेम्पो, दोन पिकअप, मोबाईल, रोख रक्कमेसह अंदाजे एक कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.