Mon, Mar 25, 2019 05:09
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › सर्जेपुर्‍यातील हुक्का पार्लरवर छापा

सर्जेपुर्‍यातील हुक्का पार्लरवर छापा

Published On: Apr 27 2018 12:51AM | Last Updated: Apr 26 2018 11:10PMनगर : प्रतिनिधी

शहरातील सर्जेपुरा भागात एका निवासी ईमारतीच्या तळमजल्यात बेकायदेशीररीत्या चालणार्‍या हुक्का पार्लरवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकला. यावेळी स्नूकर व हुक्का पार्लर चालविणार्‍या कृष्णा अशोक इंगळे याच्यासह 30 ग्राहकांना पोलिसांनी अटक केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सर्जेपुरा भागातील एका निवासी इमारतीत अवैधरित्या हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक संजयकुमार सोने, पोलिस नाईक वाघचौरे, दौड, गायकवाड, कॉन्स्टेबल जगताप, रोहोकले,कोतकर, जावेद शेख आदींच्या पथकाने पार्लरवर छापा टाकला.

यावेळी ग्राहक म्हणून आलेल्या 30 जणांना अटक करण्यात आले. त्यामध्ये जस्विन राकेश पहूजा (रा. 162, रिद्धी सिद्धी कॉलनी, गुलमोहोर रोड), अहमद गयाज कुरेशी (रा. नालबंद खुंट, अंजुमन स्कुलजवळ, पिरशाह खुंट), गिरीश चुहीत्रामानी (रा. उल्हासनगर, प्रियदर्शनी अपार्टमेंट, गोलमैदान), संजय सदामल बोहरानी (रा. ब्लॉक नं. 1430, सेक्शन 30, उल्हासनगर), प्रशांत गजानन सोनावणे (रा. धुतसागर कॉलनी, अमरधाम समोर), सचिन संजय घोरपडे (रा. रामवाडी, सर्जेपुर), विशाल वीरेंद्र पितळे (रा. नवजीवन कॉलनी, मार्केटयार्ड), महावीर सरदारमल शिंगी (रा. माणिकचौक कारंजा समोर), स्वप्नील संजय जैन (रा. बागडपट्टी), नागेश गोरख शिंदे (रा. वैदूवाडी, सावेडी), जयेश तुकाराम भिंगारदिवे (रा. सावेडी गाव), दत्तात्रय अंबादास गोसके (रा. कुंभारगल्ली, बागडपट्टी), किरण चंद्रकांत बोगा (रा. सातभाई गल्ली), सचिन नरसैय्या पासकटी (रा. कुंभार गल्ली, बागडपट्टी), वैभव दीपक कोठा, चिल्का प्रेम गोविंदा, ओम संजय पुंड (तिघेही रा. सातभाई गल्ली), राज नरेश नागुल (रा. भिस्तबाग चौक), मोहित प्रदीप मुथ्था (रा. पारिजात कॉलनी, सारसनगर), सागर विलास मुनोत (रा. सुखसागर हॉटेलमागे, मार्केटयार्ड), अमित भाऊसाहेब शेवाळे (रा. आनंदनगर, गुलमोहोर रोड), वृषभ हेमंत डागा (रा. गोवर्धन अपार्टमेंट), अमोल राजेंद्र पवार (रा. कोहिनुर मंगल कार्यालयामागे, सावेडी), वृषभ प्रदीप मेहता (रा. कांडेकर हॉस्पिटल मागे, सावेडी), बलराम अशोक कोकांत (रा. नवरंग व्यायाम शाळा, तोफखाना), अजय दराडे (रा. बागडपट्टी), संदेश अतुल भंडारी (रा. खिस्त गल्ली), गगन शरद शिंदे (रा. माळीवाडा), सागर आनंद नायडू (रा. संजय नगर, काटवन खंडोबा), अबरार नय्युम शेख (रा. बाराईमाम कोठला) आदींचा समावेश आहे.

वरील सर्व आरोपी हे सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून हुक्का पितांना आढळून आले. याठिकाणी विविध फ्लेवरचे हुक्का व 8 हुक्का पॉट जप्त करण्यात आले. आरोपींविरुद्ध तोफखाना पोलिस स्टेशनला सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने जाहिरात प्रतिबंध व्यापार उत्पादन पुरवठा वितरण विनिमय अधिनियम 2003 च्या कलम 4 व मुंबई पोलिस अधिनियम कलम 37 (7) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून शांतता भंग होण्याची माहिती मिळाल्याने सर्वांना अटक करण्यात आली.