होमपेज › Ahamadnagar › राहुरीत दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू, आईचा शोध सुरू

राहुरीत दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू, आईचा शोध सुरू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

राहुरी :  प्रतिनिधी

राहुरी तालुक्यातील खंडाबे खुर्द येथे एका विहिरीत पडून दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला तर त्यांच्या आईचा अद्याप शोध लागू शकलेला नाही. ही घटना शनिवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

खडांबे खुर्द येथील प्रशांत कल्हापुरे यांचा पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. प्रशांत हे शेतकरी आहेत. त्यांच्या अराध्या प्रशांत कल्हापुरे (वय ६), अक्षदा प्रशांत कल्हापुरे (वय ९) या दोन मुलींचा मृतदेह शनिवारी दुपारी जवळच्याच एका विहिरीत आढळून आला. हे दोन्ही मृतदेह पोलिस व ग्रामस्थांनी विहिरीतून बाहेर काढले आहेत तर मुलींच्या आईचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. संबंधित विहिर ही शांताराम कल्हापुरे यांच्या मालकीची आहे. ही घटना कशी घडली, याबाबत अद्याप काहीच माहिती हाती आलेली नसून, याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत. मृत मुलींच्या आईचा शोध लागल्यास घटनेचा उलगडा होऊ शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.