Fri, Apr 26, 2019 15:20होमपेज › Ahamadnagar › साईबाबांचे नाव मतदारयादीत! 

साईबाबांचे नाव मतदारयादीत! 

Published On: Aug 29 2018 1:30AM | Last Updated: Aug 29 2018 12:43AMराहाता : प्रतिनिधी

मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी असलेला नमुना 6 अर्ज चक्क साईबाबांच्या नावाने भरण्यात आल्याचे उघड झाले आहे. शासकीय यंत्रणेची दिशाभूल करून धूळफेक केल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध राहाता पोलिस ठाण्यात सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार माणिकराव आहेर यांनी फिर्याद दाखल केली आहे. 

शिर्डी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या मतदार नोंदणी व पुन:रिक्षण कार्यक्रमांतर्गत   ऑनलाईन वेबसाईटवरून मतदारयादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे, तसेच नावात दुरुस्ती, पत्ता, वय इत्यादी बदलांसाठी विविध फॉर्म भरण्याची सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार शिर्डी विधानसभा मतदारसंघात 1 जानेवारी 2018 या अर्हता दिनांकापर्यंत 1992 ऑनलाईन अर्ज राहाता तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. या अर्जांमध्ये दि. 4 डिसेंबर 2017 रोजी प्राप्त झालेल्या नमुना 6 अर्जामध्ये नाव साई, वडिलांचे नाव राम व साईबाबांच्या फोटोची प्रतिमा वापरत इतर माहिती निरंक ठेवून नाव समाविष्ट करण्याचा ऑनलाईन अर्ज सादर केला असल्याचे सहायक नोंदणी अधिकार्‍यांच्या निदर्शनास आले आहे.