Wed, Jul 17, 2019 11:59होमपेज › Ahamadnagar › पुणे व कल्याण महामार्ग रोखले!

पुणे व कल्याण महामार्ग रोखले!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पारनेर : प्रतिनिधी   

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील जनतेने नगर-पुणे व नगर-कल्याण महामार्गांवर अभिवन रास्ता रोको आंदोलन केले. रस्ता आडविण्यात आला. मात्र संबंधित वाहनचालक, तसेच प्रवाशांना आंदोलनाचे पत्रक, तसेच गुलाबपुष्प देण्यात येउन ते वाहन पुढील प्रवासासाठी सोडून देण्यात आले!

मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावरील पारनेर फाटा येथे, तर नगर-कल्याण महामार्गावर भाळवणी येथे रास्तारोको आंदोलन सुरू करण्यात आले. दोन्ही महामार्ग असल्याने पारनेर व सुपा पोलिसांपुढे आव्हाण होते. आंदोलकांनी मात्र अण्णा हजारे यांना अभिप्रेत असलेले आंदोलन करून आगळा आदर्श निर्माण केला. अडविण्यात आलेल्या वाहनांतील प्रवाशांना पत्रक तसेच फुले दिल्यानंतर ते वाहन पुढे जात होते. त्यामुळे या आंदोलनाचा प्रवाशांनाही फटका बसला नाही. फलक तसेच तिरंगा ध्वज हाती घेतलेले आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक प्रवाशांना आपली वाहने बाजूला लावून आंदोलनात सहभाग घेतला. प्रवाशांनी आंदोलनाचे समर्थन करून पत्रके तसेच फुले स्वीकारली. पारनेर फाटा येथे झालेल्या आंदोलनात गणेश शेळके, अशोक सावंत, राहुल शिंदे, संतोष खोडदे, जयसिंग मापारी, लाभेश औटी, दादासाहेब पठारे, सोन्याबापू भापकर, सीमा औटी, कौशल्या हजारे, पुष्पा गाजरे, शीला नवले यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. 

नगर-कल्याण रस्त्यावर सकाळी सव्वानऊ वाजता आंदोलनास सुरूवात झाली. भाळवणी परिसरातील नागरिक उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी झाले होते. साडेदहा वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी सेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले, संदीप ठुबे, अशोक रोहोकले, बाबाजी तरटे, सुलतान शेख, गुलाबराव डेरे, सुभाष रोहोकले, गंगाधर रोहोकले, नामदेव रोहोकले, प्रशांत रोहोकले यांच्यासह हजारो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. 

नगर पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथील टोलनाक्यावरही रास्तारोको आंदोलन करण्यात आले. समर्थ शिक्षण संस्थेचे विद्यार्थीही आंदोलनात सहभागी झाले होते. प्रवाशांना पत्रके तसेच फुलांचे वितरण करण्यात आले. नीलेश लंके, सबाजी गायकवाड, कैलास गाडीलकर, संजय वाघमारे, शंकर नगरे, मार्तंड बुचुडे, दादा शिंदे, संदीप मगर आदी यावेळी उपस्थित होते.


  •