Wed, Mar 20, 2019 02:38होमपेज › Ahamadnagar › छिंदमला पोलिस संरक्षण; निषेधार्थ मनपासमोर घोषणाबाजी

अहमदनगर : छिंदमच्या हजेरीने महासभेत गोंधळ

Published On: Aug 02 2018 12:59PM | Last Updated: Aug 02 2018 8:52PMअहमदनगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या श्रीपाद छिंदमने पोलिस बंदोबस्तात नगर महापालिकेच्या सभेला हजेरी लावल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. छिंदमने हजेरी लावताच नगरसेवकांनी घोषणाबाजी करत विरोध केला. छिंदमने दिलेले निवेदन स्वीकारु नये, अशी मागणी सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी केली.

छिंदमला मागच्या दारातून सभागृहात आणल्यामुळे नगरसेवकांनी महापौर सुरेखा कदम यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला. दरम्यान छिंदमने अधिकृत हजेरी लावल्यानंतर पोलिसांनी बंदोबस्तात छिंदमला सभागृह व महापालिकेबाहेर बाहेर नेले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने सभा तहकूब करण्याची मागणी केली आहे.

शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या छिंदमला महापालिका सभेत उपस्थित राहण्यासाठी पोलिस बंदोबस्त दिल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड व शिवप्रेमींकडून निदर्शने करण्यात आली. यावेळी महापालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी केली गेली. याप्रकरणी गोरख दळवी यांच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महापालिकेची सभा आज दुपारी होणार असून या सभेला श्रीपाद छिंदम उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यावेळी त्याला पोलिस बंदोबस्त दिला गेला आहे. याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड आणि शिवप्रेमींकडून निदर्शने करण्यात आली. तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे.

Updates :

>महापौर साहेब छिंदमने दिलेले निवेदन स्वीकारु नका : अनिल शिंदे

> छिंदमच्या निवेदनामुळे सभागृहात गोंधळ

> सभा तहकूब करण्याची राष्ट्रवादी नगरसेवकांची मागणी

> छिंदमला सभागृहात मागच्या दारातून प्रवेश मिळाल्याने नगरसेवक संतापले

> श्रीपाद छिंदमची महापालिकेत हजेरी

> मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना महापालिकेच्या सभागृहात नगरसेविका दीपाली बारस्कर यांनी वाहिली श्रध्दांजली

> भाजप कार्यालयावर कारवाईचा नगरसेवक किशोर डागवाले यांनी नोंदविला निषेध; पक्षाची बदनामी केल्याचा आरोप