Sun, Nov 18, 2018 20:08होमपेज › Ahamadnagar › घरात गळफास घेऊन प्राध्यापिकेची आत्महत्या

घरात गळफास घेऊन प्राध्यापिकेची आत्महत्या

Published On: Mar 04 2018 1:46AM | Last Updated: Mar 04 2018 12:49AMअकोले : प्रतिनिधी 

येथील अगस्ती महाविद्यालयात संगणक शाखेमध्ये कार्यरत असलेल्या प्रा. मयुरी अ‍ॅथनी कारडोझ (वय 24) यांनी शुक्रवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या  श्रीरामपूर येथील रहिवासी आहेत.

मयुरी या नवलेवाडी परिसरातील अमृतनगर येथे भाडोत्री खोलीत राहत होत्या. शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान मयुरीचा भाऊ तिला श्रीरामपुरहून मोबाईल करीत होता. मात्र, ती फोन उचलत नव्हती. म्हणून त्याने घरमालकास मयुरी फोन उचलत नसल्याचे सांगत तिला उठवून फोन घ्यायला सांगा, असे सांगितले. घरमालकाने मयुरीच्या खोलीचा दरवाजा वाजविला. परंतु आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दरवाजा लोटला तेव्हा घरमालकाच्या हा प्रकार लक्षात आला. मयुरी या अगस्ती महाविद्यालयात चार वर्षापासून प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.