Sun, Jul 05, 2020 03:40होमपेज › Ahamadnagar › एरंडाच्या बियांनी मुलांना विषबाधा

एरंडाच्या बियांनी मुलांना विषबाधा

Published On: Dec 19 2017 1:55AM | Last Updated: Dec 18 2017 11:30PM

बुकमार्क करा

जामखेड : प्रतिनिधी

भूम तालुक्यातील (जि. बीड) घुलेवाडी येथील एरंडाच्या बियांनी मुलांना विषबाधाजिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी 15 ते 20  मुलांनी  शाळेच्या  मधल्या  सुट्टीत  एरंडाचे बिया  खाल्ल्याने  त्यांना  ऊलट्या व मळमळ होऊन त्रास होऊ लागल्याने मुख्याध्यापक गोरे यांनी पालकांना बोलावून घेता जामखेड तालुक्यातील खर्डा येथील रुग्णालयाल दाखल केले. 

याबाबत माहिती कळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, कॅप्टन  लक्ष्मण भोरे यांनी सरकारी दवाखान्यास भेट  दिली.  कोठारी यांनी डॉ. युवराज खराडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. घटनेची माहिती दिली. डॉ. खराडे यांनी रूग्णालयात येऊन उपचार सुरू केले आहेत. 

घुलेवाडी येथील  जि. प. शाळेतील पहिली ते  पाचवीतील विद्यार्थी आदित्य किरण जायभाय, तुषार गणेश खामकर, प्रेमानंद विष्णू घुले, विकास बाळू  गायकवाड, काका सुभाष गोपाळघरे, अजय सतिष गोपाळघरे,  आदित्य आशोक  डोंगरे, अस्मिका फुलचंद डोंगरे, दिक्षा फुलचंद  डोंगरे, राधा भरत  घुले, ऋतुजा सुरेश  घुले, स्नेहा संभाजी  घुले, कोमल ज्योतीराम  घुले, रेश्मा ज्योतीराम घुले, प्रिती सुरेष घुले या 6 ते 10 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना बाधा झाली आहे.सुदैवाने सर्वांची परिस्थिती चांगली आहे.

खर्ड्याहून डॉ. संजय  ठाकरे व अनिल  गोलोकर यांनी  ताबडतोब मुलांना जामखेड येथे आणले. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी  यांनी  माहिती  देताच  वैद्यकीय अधिकारी डॉ.  युवराज  खराडे यांनी दुपारी नेमणूक नसताना उपचार केले. या वेळी  डॉ. सुनिल  बोराडे, प्रविण  मंडलेचा,  महेश  धसे, शिंदे यांनी  ताबडतोब औषधोपचार केले. त्यामुळे प्राण वाचले. या घटनेची माहिती जामखेड येथील गटशिक्षणाधिकारी पोपट काळे यांना मिळताच ते मदतीसाठी धावले.  गट साधन केंद्रातील कदम, मोमीन ग्रामीण रुग्णालयात आले. भूमचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी जाधव यांनी व मुख्यध्यापकांसह शिक्षकांनी तात्काळ केलेल्या धावपळीबाबत समाधान व्यक्‍त केले.