Thu, Feb 21, 2019 09:38होमपेज › Ahamadnagar › पोलिस पतीच्या छळास कंटाळून पत्नीची आत्महत्या

पोलिस पतीच्या छळास कंटाळून पत्नीची आत्महत्या

Published On: Apr 12 2018 3:09PM | Last Updated: Apr 12 2018 3:09PMअहमदनगर : प्रतिनिधी

मुलीच्या उपचारासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी पत्नीला वारंवार त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. विकास नानाभाऊ सातपुते असे गुन्हा दाखल झालेल्‍या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्‍यासोबत सासू शोभा नानाभाऊ सातपुते, दिर प्रकाश नानाभाऊ सातपुते, प्रियांका प्रकाश सातपुते, सासरे सतीष गायकवाड यांच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याप्रकरणी आरोपींना अटक करण्याची कारवाई सुरु आहे. विकास सातपुते हा तोफखाना पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. 

सासरच्या त्रासाला कंटाळून प्रणाली विकास सातपुते हिने बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी प्रणालीची आई विजयश्री दगडू उजागरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, प्रणाली उजागरे यांचे ४ वर्षापुर्वी विकास सातपुते याच्याशी लग्न झाले. या दांपत्याला अडीच वर्षाची मुलगी असून,  मुलगी झाल्यानंतर नवऱ्यासह सासरच्या मंडळींनी प्रणालीला त्रास देण्यास सुरुवात केली. ‘तुला मुलगी झाली असून, ती एका हाताने अपंग आहे. तुझ्या मुलीच्या औषधोपचारासाठी आई-वडिलांकडून पैसे घेऊन ये’ अशी सातत्याने मागणी करत होते. माहेरच्या लोकांनी पैसे न दिल्यास प्रणाली व मुलीला सासरची मंडळी त्रास देत असत. अपंग अणाऱ्या मुलीच्या हाताचे ऑपरेशन करण्यासाठी पती विकास सातपुते याने सासरच्या मंडळीकडे १ लाख रुपयांची मागणी केली होती. ‘तुम्ही आजच्या आज पैसे द्या, मला माझे घरचे लोक खूप त्रास देत आहेत, तुम्ही ताबडतोब पैसे घेऊन घरी या’ असे १० एप्रिल २०१८ रोजी प्रणालीने वडील दगडू उजागरे यांना फोनवरुन कळविले होते. त्यानंतर वडील उजागरे यांनी प्रणालीच्या घरी जाऊन घरच्यांना समजावून सांगितले होते. तसेच आज पैसे देतो असेही यावेळी सांगितले होते. मात्र तत्पुर्वीच प्रणालीने छळाला कंटाळून बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादित म्हटले आहे
 

Tags : ahmednagar, police waif