Wed, Sep 19, 2018 11:18होमपेज › Ahamadnagar › पाथर्डीच्या पोलिस निरीक्षकांचा बदली

पाथर्डीच्या पोलिस निरीक्षकांचा बदली

Published On: Feb 15 2018 4:08PM | Last Updated: Feb 15 2018 4:08PM
नगर : प्रतिनिधी

नगर जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने कोपरगाव आणि पाथर्डी येथील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याची माहिती हाती आली आहे. जिल्ह्यातील इतरही काही महत्त्वाच्या ठिकाणच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

पाथर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागेवर राकेश मानगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चव्हाण यांची मानवी तस्करी विरोधी विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी पोलिस निरीक्षक दिलीप पारेकर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. पारेकर हे कोपरगाव पोलिस ठाण्यास नियुक्तीस होते