होमपेज › Ahamadnagar › पोलिस निरीक्षकाची वर्दीच गेली चोरीला

पोलिस निरीक्षकाची वर्दीच गेली चोरीला

Published On: Aug 13 2018 12:27PM | Last Updated: Aug 13 2018 12:27PMनगर: प्रतिनिधी

सव्वासहा लाख रुपयांच्या फसवणुकीस बळी ठरलेल्या पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांची खाकी वर्दीही चोरीला गेली आहे. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, ओमासे हे शेवगाव शहरात एका भाड्याच्या खोलीत राहतात. रविवारी (दि. 12) सकाळी सात वाजता त्यांची सरकारी वर्दी चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर ओमासे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली आहे.

फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासातच ओमासे यांची खाकी वर्दी चोरीला गेल्याने हा विषय जिल्हा पोलिस दलात चांगला चर्चेचा ठरला आहे.