Thu, Apr 25, 2019 14:14होमपेज › Ahamadnagar › आमदार कर्डिलेंसह ५ जणांना दोन दिवसांची कोठडी

आमदार कर्डिलेंसह ५ जणांना दोन दिवसांची कोठडी

Published On: Apr 10 2018 6:26PM | Last Updated: Apr 10 2018 6:26PMनगर: प्रतिनिधी

पोलीस अधिक्षक कार्यालयावर दगडफेक केल्याप्रकरणी अटक केलेल्या भाजप आमदार शिवाजी कर्डिले, अफजल शेख या दोघांच्या पोलीस कोठडीमध्ये दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तसेच नव्याने अटक केलेल्या सारंग पंधाडे, सुरेश बनसोडे, शुभम राजवाळ यांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.   

पोलीस अधीक्षक कार्यालयातून संग्राम जगताप यांना पळवण्यासाठी आलेला जमाव हा अरुण जगताप यांनी बोलाविल्याची माहिती आरोपींनी पोलिस कोठडी दिली आहे. तपासादरम्यान आरोपींनी साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे साक्षीदारांवर दबाव आणल्याचे कलम वाढविण्यात आले आहे.