Mon, Aug 19, 2019 06:57होमपेज › Ahamadnagar › राहात्यात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन

राहात्यात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन

Published On: Jan 15 2018 1:40AM | Last Updated: Jan 14 2018 10:38PM

बुकमार्क करा
राहाता : प्रतिनिधी

कोपरगाव, शिर्डी, लोणी, राहाता परिसरातील वाढत्या चोर्‍या व लूटमार यांसारख्या घटना सातत्याने होत असल्याने काल मध्यरात्री साकुरी व गोदावरी वसाहत येथे कोबिंग ऑपरेशन मोहीम राबविण्यात आली. नगर-मनमाड महामार्गावर साई सिद्ध संकल्प मंगल कार्यालयाजवळ रात्री 3.15 वाजता 6 व्यक्ती  पोलिसांना दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना किशोर भाऊसाहेब बनसोडे (वय 19), अजित बाबासाहेब बनसोडे (वय 19) सनी जगन्नाथ बनसोडे (वय 21) सुभाष ज्ञानेश्वर पवार (वय 22) सागर प्रकाश गायकवाड (वय 22) शनिदेव सुधाकर थोरात (वय 21, सर्व साकुरी व राहाता) यांना हत्यारांसह गस्तीवरील पोलिसांनी अटक केली.

या मोहिमेदरम्यान नीरज विलास बनसोडे (20), रवी भारत बनसोडे (वय 24, दोघे साकुरी), प्रदीप ज्ञानेश्वर कासार ( वय25, रा. गणेशनगर), सोमनाथ मुरलीधर डांगे (वय 28, रा. राहाता), बाबासाहेब लक्षण आरणे (वय 40, रा. साकुरी) यांना राहाता न्यायालयाने पकड वॉरंट जारी केल्याने त्यांनाही अटक करण्यात आली. तसेच राहाता शहरात संशयास्पद फिरणारे सागर चंद्रकांत थोरात (वय 23, रा. एकरुखे), प्रदीप सुनील सोनवणे (21, रा. काकडी ता.कोपरगाव), सुदर्शन सुधाकर थोरात (वय 30 रा.साकुरी), या यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.