Sat, Feb 16, 2019 16:51होमपेज › Ahamadnagar › भारत बंद : संगमनेरमध्ये कडकडीत बंद

भारत बंद : संगमनेरमध्ये कडकडीत बंद

Published On: Sep 10 2018 4:13PM | Last Updated: Sep 10 2018 4:13PMसंगमनेर : प्रतिनिधी 

भारतीय राष्ट्रीय  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  पेट्रोल, डिझेल भाववाढ आणि   महागाईच्या विरोधात भारत बंदची घोषणा केली होती.  याचे पडसाद संगमनेमध्येही जाणवले. माजी महसूलमंत्री तसेच काँग्रेसच्या राष्ट्रीय सामीतिचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वातखाली आज भारत बंदला संगमनेरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.  

संगनेर शहरातील सर्व व्यपार्यांनी आपले व्यवहार बंद ठेवत कडकडीत बंद पळाला.  या बंदमध्ये तालुक्यातील घारगाव, बोटा, साकुर, अश्वि, तळेगाव, निमोण, धांदरफळ या गावांमध्ये कडकडीत  बंद पाळण्यात आला.  तसेच सकाळपासून संगमनेर अगरातून  एकही बस बाहेर   न  पडल्यामुळे प्रवाशी वर्गाचे अतोनात हाल झाले आहे.