Fri, Jul 19, 2019 19:51होमपेज › Ahamadnagar › ‘साईनगर’जिल्हा झालाच पाहिजे

‘साईनगर’जिल्हा झालाच पाहिजे

Published On: Feb 09 2018 1:58AM | Last Updated: Feb 08 2018 10:16PMबाळासाहेब सोनवणे, राहाता

शि र्डी जिल्हा झाला पाहिजे अशी अनेकांची इच्छा आहे.  शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी जिल्ह्याला लागणारे सर्व बाबींची पुर्तता जागेअभावी या ठिकाणी होईल का ?  हे पाहणे गरजेचे आहे. उत्तर विभागात कोपरगांव, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले, राहाता, राहुरी हे तालुके येतात. यापैकी कोणत्या तालुक्यात सध्या सर्व शासकीय कार्यालये उपलब्ध आहेत, हे पहाणे गरजेचे आहे. नवीन जिल्हा निर्मिती करण्यासाठी शेकडो कोटी रुपये शासनाला खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे सध्या कोणत्या तालुक्याला जिल्ह्यासाठी लागणारी सर्वच कार्यालये आहे हे पहाणे गरजेचे आहे. साईनगर हे नाव जिल्हा विभाजनाला द्यावे व शिर्डी नजीक असलेल्या राहाता तालुक्यात या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालयाची उभारणी करून या नवीन जिल्हा नावारुपास यावा, अशी अपेक्षा तालुक्यातील नागरीकांची आहे.

रामपूर, संगमनेर या ठिकाणी जिल्हा विभाजन व्हावे, अशी अपेक्षा तेथील जनतेची आहे. शिर्डी हे देशातील दोन नंबरचे तीर्थक्षेत्र समजले जाते. या ठिकाणी लाखो साईभक्त साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. येथील जमिनीचे भाव गगणाला भिडले आहेत. साईबाबा संस्थानला वेगवेगळे उपक्रम राबविण्यासाठी व भक्तांच्या सुविधांसाठी शिर्डीत जागा कमी पडत आहे. असे असतानाही शिर्डी या ठिकाणी जिल्हा झाला तर साईबाबा संस्थानला सर्व शासकीय कार्यालयांसाठी व औद्योगिक वसाहतीसाठी व इतर कार्यालयासाठी भुखंड शोधणे व खरेदी करणे परवडेल का? साईबाबा संस्थानला यासाठी पैसा द्यावा लागेल हे संस्थानला परवडेल का? भक्तांनी देणगी स्वरुपात दिलेला पैसा भक्तांच्या सोयींसाठी खर्च करण्याऐवजी तो शासनाच्या जागा खरेदीसाठी जायला नको. जिल्ह्याच्या ठिकाणी नेहमीच वेगवेगळे आंदोलने होतात. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्‍न त्या ठिकाणी कायम निर्माण होतो. शिर्डीत येणार्‍या भाविकांना याचा त्रास नको म्हणून जिल्हा विभाजन इतरत्र कुठेही झाले तरी चालेल परंतु साईनगर हे नांव त्यासाठी दिले पाहिजे. शिर्डी या ठिकाणी शासकीय कार्यालये आले तर येथील कर्मचार्‍यांना नागरीकांना सुविधा देण्याऐवजी वरिष्ठ अधिकार्‍यांना दर्शनासाठी घेऊन जाण्याकरिता दररोज वेळ द्यावा लागेल व वरिष्ठ अधिकार्‍यांची मर्जी राखण्यासाठी त्यांना शासकीय काम सोडून त्यांचेसाठी वेळ द्यावा लागेल. शिर्डी या ठिकाणी साईबाबा संस्थानला विविध प्रकारच्या योजना राबविण्यासाठी पुरेसी जागा उपलब्ध नाही. नुसतेच लोकांच्या भावनांकडे न पाहता भक्तांच्या सुविधा पहाणे गरजेचे आहे. राहाता या ठिकाणी बागायत जमिनी आहेत. या ठिकाणी जिल्हा झाला तर बागायत जमिनी अधिग्रहण करणे शासनाला परवडेल का? तालुक्यात अनेक ठिकाणी महामंडळाच्या जमिनी आहेत. परंतु अद्याप त्या जमिनी खंडकरी शेतकर्‍यांना देणे बाकी आहे. 

इतरत्र कोणत्या ठिकाणी औद्योगिक वसाहत आहे, रेल्वे सुविधा आहे. पोलिस अपर अधीक्षक कार्यालय आहे, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मुख्य डाक घर या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी नवीन जिल्ह्याची निर्मिती केली तर शासनाला नवीन कार्यालय उभारणीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करावे लागणार नाही. 

अनेक वर्षापासून शिर्डी, संगमनेर, कोपरगांव, श्रीरामपूर या ठिकाणी नवीन जिल्हा व्हावा अशी इच्छा त्या त्या ठिकाणच्या नागरीकांची आहे. परंतु जिल्ह्यासाठी लागणार्‍या विविध प्रकारच्या योजना या ठिकाणी सहजरित्या उपलब्ध होतील का हे पहाणे गरजेचे आहे. जनतेच्या भावना बरोबरच नागरीकांना सुखसुविधा मिळणे गरजेचे आहे. 

या सर्व गोष्टींची शासनाने दखल घेवून शिर्डी जवळ असलेल्या राहाता परिसरात जिरायत भागातील शेती खरेदी करून त्या ठिकाणी शासकीय कार्यालयांची निर्मिती केली व साईनगर हे नांव नवीन जिल्हा निर्मितीला दिले तरच संपूर्ण जगात या नवीन जिल्ह्याचे नाव ओळखले जाईल.

जिल्ह्याला ‘साईनगर’ची ओळखं

शिर्डी या ठिकाणी नवीन जिल्ह्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. परंतु या ठिकाणच्या जमिनीचा भाव गगणाला भिडल्याने व भक्तांसाठी दर्शनासाठी या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये म्हणून शिर्डीजवळ असणार्‍या राहाता परिसरात सर्व शासकीय कार्यालयांची निर्मिती करुन या ठिकाणी नवीन जिल्हा निर्मितीला साईनगर हे नांव द्यावे, त्यामुळे नवीन जिल्ह्याची ओळखही संपुर्ण जगाला होईल.