Tue, Aug 20, 2019 15:33होमपेज › Ahamadnagar › मोदींच्या विरोधात जनतेची 'मन की बात'

मोदींच्या विरोधात जनतेची 'मन की बात'

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 27 2017 10:47AM

बुकमार्क करा

पारनेर : प्रतिनिधी      

भ्रष्टाचारमुक्त भारत निर्मितीचा संकल्प करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच भ्रष्टाचारास प्रतिबंध करणारा कायदा कमजोर केला. तसेच निवडणुकीत दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. त्यामुळे देशातील जनतेचा मोदी सरकारवरील विश्‍वास उडाला आहे. देशातील जनताच आता ‘मन की बात’ बोलू लागली आहे. विविध राज्यांत घेतलेल्या सभांमध्ये त्याचा प्रत्यय आल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी राळेगणसिद्धीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी; तसेच लोकपाल व लोकायुक्तांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी हजारे हे येत्या 23 मार्चपासून नवी दिल्लीमध्ये बेमुदत आंदोलन  करणार आहेत. या आंदोलनाच्या जनजागृतीसाठी हजारे हे 9 डिसेंबरपासून उत्तर भारताच्या दौर्‍यावर होते. सोमवारी हा दौरा आटोपून राळेगणसिद्धीत परतल्यानंतर, त्यांनी प्रतिनिधींशी संवाद साधला.