Fri, Apr 26, 2019 09:20होमपेज › Ahamadnagar › नगराध्यक्षांना विविध संघटनांचा घेराओ

नगराध्यक्षांना विविध संघटनांचा घेराओ

Published On: Jan 16 2018 2:08AM | Last Updated: Jan 15 2018 10:27PM

बुकमार्क करा
पाथर्डी : शहर प्रतिनिधी 

जिजाऊ जयंतीचा पालिकेला विसर पडला होता. याबाबत ओरड झाल्याने पालिकेच्या जुन्या इमारतीत  प्रतिमा लावून जयंतीचे सोपस्कार पार पाडण्यात आले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी या प्रकाराचा निषेध करत पालिका कार्यालयात नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांना सुमारे दोन तास घेराओ घातला. त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. 

  आंदोलनामध्ये नगरसेवक महेश बोरुडे, अजिनाथ मोरे, माजी नगरसेवक चांद मणियार, डॉ. महेश लगड, लक्ष्मण डांगे, किरण बोरुडे, सोमनाथ बोरुडे, सोनू बोरुडे, गणेश शिंदे, सोपान बालवे आदींसह मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड या संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

   यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदारा घोषणाबाजी केली. पदाधिकार्‍यांनी नगराध्यक्षांना धारेवर धरत प्रश्‍नांची सरबत्ती केली. विविध प्रकारचे युक्तीवाद करूनही समाधानकारक उत्तर देऊ शकत नसल्याचे लक्षात येताच नगराध्यक्षांनी दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना आजिनाथ मोरे म्हणाले, अन्य महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी पदाधिकार्‍यांना लक्षात राहते. मात्र, जिजाऊंची जयंती लक्षात राहात नाही. जाणीवपूर्वक पालिकेकडून भेदभाव केला जात असून, प्रशासनावर कुणाचा अंकुश राहिलेला नाही. मुख्याधिकारी कधीही जागेवर सापडत नाहीत. तसेच पदाधिकार्‍यांचा बालिशपणा दूर होण्याची गरज आहे. 

    नगरसेवक बोरुडे म्हणाले, अन्य महापुरुषांच्या जयंतीला पदाधिकारी हजर असतात. पालिकेने दोन दिवसांनंतर अधिकृतपणे जयंती साजरी करण्याचे नाटक केले. अन्य कुणाला कसे कळवले नाही. चौका-चौकांत उभे राहून कामाचा देखावा करण्यासाठीचे फोटो काढण्यात तुम्हाला वेळ मिळतो. जिजाऊंच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्याची मानसिकता न दाखवल्याबद्दल सर्वांची माफी मागावी. तसेच लोकांनी तुटलेली मने जोडणार कोण, असा सवालही उपस्थित केला.