Thu, Jun 27, 2019 00:21होमपेज › Ahamadnagar › राहाता तालुक्यात विखे गटाचे निर्विवाद वर्चस्व

राहाता तालुक्यात विखे गटाचे निर्विवाद वर्चस्व

Published On: Dec 28 2017 1:55AM | Last Updated: Dec 28 2017 1:43AM

बुकमार्क करा
राहाता : प्रतिनिधी

तालुक्यातील 8 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धनगरवाडी ग्रामपंचायत सरपंचपद कोल्हे गटाकडे तर वाकडी येथे सरपंच पदासाठी अपक्षाची बाजी, कोर्‍हाळे ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले. तर भाजपला पराभवाचा धक्का बसला. बाकी सर्वच ठिकाणी विखे गटाने वर्चस्व सिद्ध केले. तालुक्यातील 8 ग्रामपंचायतीच्या मतमोजणी प्रक्रिया राहाता तहसील कार्यालय येथे सकाळी 10 वाजता सुरू झाली. अवघ्या दीड तासात आठही ग्रामपंचायतीचा निकाल लागला.  प्रारंभी धनगरवाडी ग्रामपंचायतीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या ठिकाणी सीताबाई रामभाऊ आदमाने, कोल्हे गट यांना 476 मते मिळवून ते विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले विखे गटाच्या अर्चना लोखंडे यांना 420 मते मिळाली. सदस्यपदासाठी विजयी झालेले उमेदवार भाऊसाहेब राशीनकर (164 मते), सुमन साखरे (146), उत्तम रक्टे (148), कलाबाई राशिनकर (127), अनिल रक्टे (224), मनिषा रक्टे (217), वंदना लांडे (207 ). 

पिंप्री निर्मळ ग्रामपंचायत मध्ये सरपंचपदासाठी 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. याकामी विखे गटाचे सर्व ठिकाणी उमेदवार एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून होते. त्याठिकाणी डॉ. मधुकर निर्मळ यांना 2058 मते मिळून ते सरपंचपदी निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी दत्तात्रय निर्मळ यांना 845 मते मिळाली. याठिकाणी डॉ. निर्मळ यांच्या गटाने बाजी मारली. तर विष्णू घोरपडे, सुंदरबापू निर्मळ या दोन्ही गटाला पराभवाचा सामना करावा लागला.  सदस्यपदासाठी विजयी झालेले उमेदवारः  नवनाथ निर्मळ (579), माया निर्मळ (368), विष्णू घोरपडे (402), कल्पना निर्मळ (398), विकास निर्मळ (512), मिरा निर्मळ (464), शांताबाई निर्मळ (429), शिवनाथ घोरपडे (333), माधुरी पारखे (368), वनिता घोरपडे (310), रमाकांत पवार (492), अरुणा निर्मळ (462).

कोर्‍हाळे  ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सत्तांतर होऊन येथे विखे गटाने बाजी मारली. सरपंचपदासाठी काँग्रेसच्या वैशाली थोरात यांना 1869 मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपचे संजय हेकरे यांना 1008 मते मिळाली. या ठिकाणी सरपंचपदासाठी दुरंगी सामना झाला.  सदस्यपदासाठी विजयी झालेले उमेदवार दत्तात्रय कालेकर (363), मंगल विखे (370), निर्मला ढगे (380), किरण आरणे (379), सचिन कानकाटे (406), शुभांगी मुर्तडक (386), ज्ञानेश्‍वर डांगे (203), रोहिणी डांगे (235), यमुनाबाई कोळगे (337), सुवर्णा बनसोडे (259), गोरख डांगे (बिनविरोध), कैलास डांगे (बिनविरोध), सविता चौधरी (बिनविरोध). याठिकाणी विखे गटाचे बापूसाहेब थोरात यांच्या गटाने सत्ता खेचत याठिकाणी भाजपचे डॉ. संजय हेकरे गटाला पराभवाचा धक्का दिला. 

दुर्गापूर ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक  दुरंगी झाली.  याठिकाणी सुनिता गडगे यांनी 905 मते मिळवून विजय संपादन केला. त्यांच्या प्रतिस्पर्धी लता बोरसे यांना 726 मते मिळाली. याठिकाणी सदस्य पदी विजयी झालेले उमेदवार- अनंत पुलाटे (220), सचिन वलवे (299 ), रोहिणी मनकर (327 ), दमयंती पुलाटे (304 मते), कासुबाई गागरे (बिनविरोध), अनिता गुळवे (बिनविरोध), भागवत पारखे (बिनविरोध), बाबासाहेब माळी (बिनविरोध), शकुंतला वाकचौरे (बिनविरोध) याठिकाणी ना. विखे गटाचेच दोन्हीही गट आमने-सामने निवडणुकीच्या रिंगणात होते. या ठिकाणी श्रेष्ठींविरुध्द तरुण गट असा संघर्ष पहायला मिळाला. सरपंचपदाची माळ तरुण गटाने घेतली. 

निमगाव कोर्‍हाळे ग्रामपंचायतीमध्ये शिल्पा कातोरे  1372 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी ललिता वालझाडे यांना 1220 मते मिळाली. तर तिसर्‍या क्रमांकावर रुपाली वदक यांना 112 मते मिळाली. सदस्यपदी निवडून आलेले उमेदवार- रुबीनाबाई जगताप (433 मते), स्वाती खरात (406), बाळासाहेब गाडेकर (216), कल्पना जगताप (189), नवनाथ वदक (247), रुपाली कातोरे (376), रघुनाथ कातोरे (486), दिलीप बर्डे (बिनविरोध), नारायण गाडेकर (बिनविरोध), सिंधू गोसावी (बिनविरोध), मोहिनी कातोरे (बिनविरोध), वर्षा गाडेकर (बिनविरोध). याठिकाणी भाऊसाहेब कातोरे यांच्या गटाने सत्ता काबीज केली.  दहेगाव कोर्‍हाळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंचपदाच्या जागेसाठी चौरंगी लढत झाली. याठिकाणी विखे गटाचे उमेदवार एकमेकांच्या प्रतिस्पर्धी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते. याठिकाणी विठ्ठल डांगे  547 मते मिळवून सरपंचपदी विजयी झाले.

त्यांचे प्रतिस्पर्धी भास्कर डांगे यांना दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सदस्यपदी विजयी उमेदवार- बाबासाहेब डांगे (327), माधव तासकर (346), रंजना डांगे (349), मोहिनी जाधव (272), रंजना गुंजाळ (249), संगिता डांगे (248), किरण आरणे (224), सुनिल गुंजाळ (229), लता डांगे (243)  ठिकाणी विलास डांगे यांच्या गटाने आपले वर्चस्व सिध्द केले. तर उत्तम डांगे यांच्या गटाला पराभवाचा सामना करावा लागला. दाढ बुद्रूक ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी सर्वात जास्त 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. याठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप असा तिरंगी सामना पहावयास मिळाला. याठिकाणी ना.विखे गटाचे सर्वच सदस्य निवडून आले. सरपंच पदासाठी पूनम योगेश तांबे यांनी 1812 मते मिळवून विजय संपादन केला.

तर त्यांच्या प्रतिस्पर्धी अलका तांबे यांना 1176, शोभा गाडेकर यांना 899, सिमरन इमानमदार यांना 346 मते मिळाली. सदस्यपदी विजयी झालेले उमेदवार- संतोष वाणी (512), कल्याणी सातपुते (490), सलालउद्दीन इनामदार (255), वैशाली बनसोडे (559 ), विजय तांबे (389 मते), रामदास गाडेकर (481), मुकुंद तांबे (493), अंजली पाळंदे (588), बेबी चव्हाण 489), शुभांगी गाडेकर (बिनविरोध), किसन साळवे (बिनविरोध), लता माळवदे (बिनविरोध), मंगल कडलग (बिनविरोध), गोकुळ गाडेकर (बिनविरोध), भागवत तांबे (बिनविरोध), बेबी कदम (बिनविरोध), संगिता पाळंदे (बिनविरोध). 
तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असणारी ग्रामपंचायत व प्रतिष्ठेची मानली जाणार्‍या वाकडी ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. याठिकाणी विखे गट, कोल्हे गट, विखे गट काळे गट असे एकत्र होवून तिरंगी लढत झाली. मात्र याठिकाणी अपक्ष उमेदवार डॉ. संपत शेळके 2296 मते मिळवून विजय संपादन केला. प्रतिस्पर्धी नारायण शेळके यांना 1580  तर अनिल शेळके यांना 1476 व आण्णासाहेब कोते यांना 1436 मते मिळाली.

याठिकाणी सदस्यपदी विजयी झालेले उमेदवार- विष्णू लहारे (562), सिंधुबाई भालेराव (648), जयश्री शेळके (562), अमित आहेर  (494), जालिंदर कोते (467), ज्योती लहारे (831), सुवर्णा शेळके (564), सुनिल कुरकुटे (556), शितल सदाफळ (529), सुवर्णा लहारे (438), अविनाश खरात (435), अनिल गोरे (512), कावेरी एनगे (389), बापू पवार (700), मुक्ता लांडे (720), जयश्री जाधव (785). 
नवनिर्वाचित सरपंच डॉ. संपत शेळके यांनी निकालानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले, आपण ना. राधाकृष्ण विखे व युवा नेते डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत.