Thu, Jun 20, 2019 02:04होमपेज › Ahamadnagar › ...तर मुख्यमंत्र्यांना फिरू देणार नाहीः धनंजय मुंडे

...तर मुख्यमंत्र्यांना फिरू देणार नाहीः धनंजय मुंडे

Published On: Apr 18 2018 7:00PM | Last Updated: Apr 18 2018 6:59PMनगर : प्रतिनिधी

शहरात २५ वर्षे सत्ता गाजवणाऱ्या शिवसेना नेत्याचे राजकारण २५ वर्षाच्या संग्राम भैय्यांनी संपवले. आगामी निवडणुकीत त्यांचे अस्तित्व धोक्यात आल्यामुळे त्यांनी आ. संग्राम जगताप यांना षडयंत्र रचून गुन्ह्यात गोवले. शिवसेना पोलिसांच्या माध्यमातून हे कुटील राजकारण करत आहे. 

पोलिस अधिक्षक कार्यालयात तोडफोड प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई कराच. मात्र केडगाव येथे दगडफेक झाली. पोलिसांवर हल्ला झाला. त्यांच्या गाड्यांची नासधूस झाली. या प्रकरणी गुन्हे दाखल होऊनही शिवसेना नेते, पदाधिकाऱ्यांना अटक केली जात नाही. याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे त्यांच्या अटकेची मागणी करणार आहे. त्यांना अटक न झाल्यास आम्ही मुख्यमंत्र्यांनाही फिरून देणार नाही, असा इशारा विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी नगर येथील राष्ट्रवादी भवनात बोलताना दिला आहे. 

दरम्यान मुंडे यांनी त्यानंतर स्व. कैलास गिरवले यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी पोलिसांकडून गिरवले यांना झालेली मारहाण, अमानुष छळ तसेच उपचारादरम्यान डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणाबाबत कुटुंबीयांनी मुंडे यांच्याकडे तक्रारी करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली.