होमपेज › Ahamadnagar › घारगाव परिसराला पुन्हा भूकंपाचे धक्के

घारगाव परिसराला पुन्हा भूकंपाचे धक्के

Published On: Aug 25 2018 2:07PM | Last Updated: Aug 25 2018 2:07PM संगमनेर : प्रतिनिधी 

 संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव परिसराला पुन्हा भूकंपाचे धक्के बसले. शुक्रवारी रात्री भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.

घारगाव परिसराला बसलेल्या या धक्क्यांची तीव्रता २.५ रिश्टर स्केल असल्याची नोंद नाशिकच्या मेरी संस्थेच्या भूमापक केंद्रावर झाली असल्याची माहिती तहसीलदार साहेबराव यांनी दिली.