Fri, Sep 21, 2018 15:22होमपेज › Ahamadnagar › नीरव मोदीची २२५ एकर जमीन शेतकर्‍यांनी घेतली ताब्यात(Video)

नीरव मोदीची २२५ एकर जमीन शेतकर्‍यांनी घेतली ताब्यात(Video)

Published On: Mar 17 2018 1:45PM | Last Updated: Mar 17 2018 1:55PMअहमदनगर : प्रतिनिधी

देशातील व परदेशी बँकांना हजारो कोटींना फसवून परदेशात पळून गेलेल्या नीरव मोदी याची नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील २२५ एकर जमीन शेतकर्‍यांनी आज पुन्हा ताब्यात घेतली. यासाठी त्यांनी या जमिनीवर आंदोलन केले होते. यानंतर जमीन ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरण्यात आली आहे.

शेतकर्‍यांनी ताब्यात घेतलेली जमीनमध्ये उद्यापासून शेती करणार आहेत. यावेळी किरण पाटील, कैलास शेवाळे, ॲड. होकेट कारभारी गवळी आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि महिला सहभागी झाल्या होत्या.