Tue, Mar 19, 2019 03:10होमपेज › Ahamadnagar › निळवंडे कालव्यांसाठी निधी मिळवून देवू

निळवंडे कालव्यांसाठी निधी मिळवून देवू

Published On: Jan 05 2018 1:04AM | Last Updated: Jan 04 2018 10:28PM

बुकमार्क करा
तळेगाव दिघे : वार्ताहर

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेत निळवंडे धरण कालव्यांच्या प्रलंबित कामास निधी मिळवून द्यावा, अशी मागणी अहमदनगरच्या शिष्टमंडळाने केली. दरम्यान, निळवंडे कालव्यासाठी निधी मिळवून देण्याची ग्वाही ना. गडकरी यांनी यावेळी शिष्टमंङळाला दिली.

 उत्तर नगर जिल्ह्यास वरदान ठरणार्‍या निळवंडे धरण कालव्यांची कामे निधी अभावी रखडली आहेत. प्रलंबित निळवंडे कालव्यांना निधी मिळावा, या मागणीसाठी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खा. सदाशिव लोखंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, नितीन कापसे, नगर जिल्हा भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाषराव गिते व संजय शिर्डीकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. 

यावेळी शिष्टमंडळाने मंत्री गडकरी यांना मागणीचे निवेदन दिले. याप्रश्‍नी सबंधित अधिकार्‍यांसमवेत त्यांनी बैठक घेतली. शिष्टमंडळाची मागणी समजून घेत चर्चा केली. यावेळी ना. गडकरी म्हणाले, महाराष्ट्रातील जलसंधारण कामांसाठी केंद्राकडून मोठा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. निळवंडे कालव्यांसाठी देखील भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल. कालव्यांची कामे पूर्ण करून दुष्काळी जनतेला न्याय देण्याची ग्वाही त्यांनी शिष्टमंडळाशी बोलताना दिली. 

ना. नितीन गडकरी यांनी लक्ष घातल्यामुळे निळवंडे कालव्यांचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागेल, असे  यविषयी बोलताना प्रा. सुभाषराव गिते यांनी सांगितले.