Wed, Aug 21, 2019 19:14होमपेज › Ahamadnagar › एटीएम फोडून २२ लाखांची रक्‍कम लंपास 

एटीएम फोडून २२ लाखांची रक्‍कम लंपास 

Published On: Aug 02 2018 6:39PM | Last Updated: Aug 02 2018 6:39PMसंगमनेर : प्रतिनिधी

नाशिक-पुणे रस्त्यावरील ऑरेंज कॉर्नर व मालदाड रस्ता या दोन ठिकाणचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले. त्यामधील सुमारे २२ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला असल्याची घटना बुधवारी मध्यरात्री २ वाजता घडली. 

ऑरेंज कॉर्नर येथील भारतीय स्टेट बँकेचे तसेच मालदाड रस्त्यावरील कॅनरा बँकेचे एटीएम फोडण्‍यात आले. ही घटना बुधवारच्या मध्यरात्री २ वाजण्‍याच्या सुमारास घडली. अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडले. 
नाशिक रोडवरील स्टेट बँकेच्या एटीएममधून १९ लाख ४२ हजार ३०० रुपये आणि मालदाड रस्त्यावरील कॅनरा बँकेचे  एटीएममधून २ लाख ६५ हजार असे या दोन्ही एटीएम सेंटरमधील कॅश बॉक्समधील २२ लाख रुपये चोरट्यांनी चोरून नेले.

ऑरेंज कॉर्नर येथील स्टेट बँकेचे  एटीएम सेंटर ८ महिन्यांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी फोडले होते. त्या चोरीचा अद्याप तपास न लागल्यामुळे  पुन्हा स्टेट बँकेत चोरीची घटना घडली. त्‍यामुळे पोलिस प्रशासनावर संगमनेरकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून श्वानपथक व ठसे तज्‍ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.