Thu, Apr 25, 2019 21:31होमपेज › Ahamadnagar › अहमदनगर : महामार्ग रोखल्याप्रकरणी राष्ट्रवादी-शिवसेनेच्या १२५ कार्यकर्त्यांवर गुन्‍हा

अहमदनगर : महामार्ग रोखल्याप्रकरणी राष्ट्रवादी-शिवसेनेच्या १२५ कार्यकर्त्यांवर गुन्‍हा

Published On: May 07 2018 3:58PM | Last Updated: May 07 2018 3:48PMसंगमनेर : प्रतिनिधी

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग  लगतच्या आंबी खालसा फाटा येथे रविवारी सुमारे तीन तास महामार्ग रोखून धरल्याप्रकरणी परिसरातील शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांसह १२५ आंदोलकांवर घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर गेल्या आठवड्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात एकाच ठिकाणी तीन जणांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले. या घटनांमुळे परिसरातील रहिवासी व ग्रामस्थ संतप्त झाले होते. या सर्व अपघातांना म्हामर्गच कारणीभूत  असल्याबाबत अनेकदा महामार्ग प्रशासनाकडे तक्रारी करुन सुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. एकाच ठिकाणी एकामागे एक असे तीन जणांचे बळी गेले त्यामुळे संतप्त झालेल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांसह ग्रामस्थांनी  सुमारे तीन तास राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. 

नाशिक व पुणे या दोन्ही  बाजूला दुतर्फा सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. तीन तास वाहतुकीचा खोळंबा झाल्याने, वाहनांमधील प्रवाशांचे हाल झाले.
 यावेळी संगमनेरचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या.  महामार्ग प्रशासनाने वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगितल्यानंतर सुमारे तीन तासाने आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, बेकायदा रस्तारोको करणे, पोलीस व प्रशासन तसेच महामार्ग अधिकाऱ्यांविरुध्द अपशब्द वापरुन घोषणाबाजी करणे, तसेच अपघाताला कारणीभूत असलेले वाहन पेटवून देण्यासाठी पोलिसांसमोर जमावाला चिथावणी देणे या कारणांसाठी आंदोलकांना दोषी धरण्यात आले. 

याबाबत सरकारच्यावतीने घारगावचे पोलिस काँस्टेबल विशाल कर्पे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात  दिलेल्या  फिर्यादवरुन शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर, राष्ट्रवादी युवकांचे उपाध्यक्ष बाळासाहेब ढोले, पंचायत समिती सदस्या प्रियंका गडगे, अरुण कान्होरे, तान्हाजी मुंढे, बाळासाहेब हांडे, अमोल थोरात, शामराव संकपाळ, राजेंद्र गाडेकर, दिलीप कहाणे, संदीप ढमढेरे, अर्जुन भोर, महादू मुंढे, बाळासाहेब गाडेकर, राहुल हांडे, शांताराम घाटकर, निजाम सय्यद, मनोज भोर, किरण भोर, ईश्वर भोर, ईश्वर कान्होरे, दत्तू कान्होरे, सुरेश गाडेकर, निवृत्ती कहाणे, अशोक गाडेकर, मनोहर पापळ, गोकुळ कहाणे, विशाल काळे, हसन शेख, सोमनाथ ढमढेरे, अविनाश भोर, रशिद सय्यद, रवींद्र काशिद, सर्जेराव ढमढेरे, नामदेव गाडेकर, अक्षय कहाणे, नूतन भुजबळ, किरण भोर, दीपक ढमढेरे, महेश घाटकर, आदेश ढमढेरे, सुरेश मुंढे, अंकुश कहाणे, वाशीम सय्यद, नितीन काशिद, नवनाथ आहेर आदीसह इतर १०० ते १२५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात, पोलिस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अन्सार इनामदार करत आहे.